२०२०-०४-१३

गीतानुवाद-१३८: तौबा ये मतवाली चाल


गीतकार: मजरूह सुल्तानपुरी, संगीतकार: लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक : मुकेश
चित्रपट: पत्थर के सनम, सालः १९६७, भूमिकाः वहिदा, मनोजकुमार, मुमताज, प्राण

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४११

धृ
तौबा ये मतवाली चाल
झुक जाए फूलों की डाल
चाँद और सूरज आकर माँगें
तुझसे रँग-ए-जमाल
हसीना तेरी मिसाल कहाँ
नको नको ही मादक चाल
वाके लाजून पुष्प बहार
चंद्र नी सूर्यही तुला मागती
सुंदर रंग खुशाल
सुंदरी तुलना न तुझी होणार

सितम ये अदाओं की रानाइयाँ हैं
कयामत है क्या तेरी अँगड़ाइयाँ हैं
बहार-ए-चमन हो, घटा हो धनक हो
ये सब तेरी सूरत की परछाईयाँ हैं
के तन से, उड़ता गुलाल कहाँ
तौबा ये मतवाली चाल
गुन्हा विभ्रमांच्या अपूर्वाईचा आहे
गिरकी तुझी अंतची पाहत आहे
फुलांचा बहर, रात वा इंद्रधनू हो
ही तर तुझ्या चेहर्‍याचीच बिंबे, तरीही
कुठे आहे, सर्वांगी, उडता गुलाल
नको नको ही मादक चाल

यही दिल में है तेरे नज़दीक आ के
मिलूँ तेरे पलकों पे पलके झुका के
जो तुझसा हसीं सामने हो तो कैसे
चला जाऊँ पहलू में दिल को दबा के
कि मेरी इतनी मजाल कहाँ
तौबा ये मतवाली चाल
मनी हेच आहे की, तुझ्यापाशी येऊन
तुझ्या पापण्यांवर पापण्या मीही पसरू
तुझ्यासारखी असता सुंदरी समोरी
जाऊ शकेन ना मना वाचवत मी
इतकी माझी ना मुळीच मजाल
नको नको ही मादक चाल

हूँ मैं भी दीवानों का इक शाहज़ादा
तुझे देखकर, हो गया कुछ ज़्यादा
ख़ुदा के लिए मत बुरा मान जाना
ये लब छू लिये हैं, यूँ ही बे-इरादा
नशे में इतना ख़याल कहाँ
तौबा ये मतवाली चाल
असे राजपुत्र मीही खुळ्यांचाच एक
तुला पाहूनी किंचित झालो प्रमत्त
कृपा कर, नको खंत त्याची करूस
अधर स्पर्शले तेही असे ग सहजच
धुंदित इतका विचार कुणास
नको नको ही मादक चाल



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.