२०१८-०५-०६

गीतानुवाद-१०९: जिंदगी मौत ना बन जाए


मूळ हिंदी गीतः जावेद अख्तर, संगीतः जतीन-ललित, गायकः सोनू निगम, रूपकुमार राठोड
चित्रपटः सरफरोश, सालः १९९९, भूमिकाः आमीरखान, सोनाली बेंद्रे

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०६१९

धृ
जिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों
खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो
जिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों
सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या
हरपते आहे शांती, देश संकटात आहे
प्राण देशास्तव, देण्याची भावना रुजवा
सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या

इक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है
इक तरफ देश में धोका है, गद्दारी है
बस्तियाँ सहमी हुई, सहमा चमन सारा है
गम में क्यों डुबा हुआ, आज सपना सारा है
आग पानी की जगह, अग्र जो बरसाएंगे
लहलहाते हुए खेत झुलस जाएंगे
खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
एकीकडे प्रेम आहे, आवडही, निष्ठाही आहे
दुसरीकडे देशातच धोका आणि फितुरीही आहे
वस्त्या भयभीत आणि देशही भयग्रस्त
आज स्वप्न आपले हे दुःखमग्न का आहे
शिंपती पाणी ना, ते वर्षती अग्नीच जेव्हा
शेते मौजेने विहरणारी होती ध्वस्त तेव्हा
हरपते आहे शांती, देश संकटात आहे
प्राण देशास्तव, देण्याची भावना रुजवा

चंद सिक्कों के लिये तुम ना करो काम बुरा
हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा
जुर्मवालों की कहाँ उम्र बडी होती है
उनकी राहों में सदा मौत खडी होती है
जुर्म करने से सदा जुर्म ही हासिल होगा
जो न सच बात कहे वो कोई बुझदिल होगा
सरफरोशों ने, लहु दे के जिसे सिंचा है
ऐसे गुलशन को उजडने से बचा लो यारों
कामे वाईट नका पत्करू पैशाकरीता
वाईटच शेवटही, हरेक वाईटाचा असे
जुल्मी लोकांचीही का जीवने मोठी असती
त्यांच्या मार्गीही सदा यमदूत उभेची असती
जुलुम केल्याने सदा, जुलुमची पदरी पडतो
सत्य न बोले जो तो, नक्की घाबरट असतो
देशभक्तांनी, रक्त शिंपून, फुलविली जी ती
उपवने ना, कदापीही उजाडू द्या हो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.