२०१६-०१-२३

गीतानुवाद-०६८: हवाओं पे लिख दो



मूळ हिंदी गीतः गुलजार, संगीतः हेमंतकुमार, गायकः किशोरकुमार
चित्रपटः दो दुनी चार, सालः १९६८, भूमिकाः किशोरकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०७१३

धृ
हवाओं पे लिख दो हवाओं के नाम
हम अनजान परदेसियों का सलाम
ये किस के लिये हैं बता किस के नाम
ओ पंछी तेरा ये सुरिला सलाम
हवेवर लिहा हा, हवेकरता राव
ह्या अनोळखी, परदेशीयांचा सलाम
कुणासाठी आहे हा, कुणाकरता सांग
ए पक्षा तुझा हा, सुरिला सलाम

शाख पर जब, धूप आई,
हाथ छूने के लिये-२
छाँव छम से, नीचे कूदी,
ह्ँस के बोली आइये
यहाँ सुबह से खेला करती है शाम
फांदीवर जव, ऊन आले,
हात लावून पाहण्या-२
सावलीने मारली उडी,
हसून म्हणाली या इथे
इथे खेळते सकाळपासून ही सांज

चुलबुला ये, पानी अपनी,
राह बहना भूलकर
लेटे लेटे, आइना चमका
रहा है फूल पर
ये भोले से चेहरे हैं मासूम नाम
चळवळे हे, पाणी आपल्या,
विसरून वाहणे पथी
शांत पडुनी, फुलावरती,
आरसा वळवे किती
भोळे हे चेहरे अन्, निरागस हे नाव





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.