गीतः फरुखकैसर, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायिकाः कमल बारोट, लता मंगेशकर
चित्रपटः पारसमणी, सालः १९६३, भूमिकाः महिपाल, गीतांजली
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०३२३
॥
धृ
॥
|
हँसता हुआ नूरानी चेहरा
काली जुल्फे रंग सुनहरा
तेरी जवानी तोबा, तोबा
दिलरुबा दिलरुबा
|
हसरा पुरा ओजस्वी चेहरा
कृष्ण कुंतले, वर्ण सुवर्णा
दिव्ययौवना, रूपसुंदरा
दिलवरा दिलवरा
|
॥
१
॥
|
पहिले तेरी आँखो ने
लुट लिया दूर से
फिर ये सितम हम पे
की देखना गुरूर से
ओ दीवाने, तू क्या जाने
दिल की बेकरारीयाँ हैं क्या
|
पहिले जादू केली
तुझ्या नयनांनी दूरूनी
मग हा जुलुम मजवर,
की जरबेची ही नजर
ए शहाण्या, तुज कळे का
मन न आवरे मुळी ते का
|
॥
२
॥
|
जी भर के तडपा ले
जी भर के वार कर
सब कुछ गंवारा हैं
थोडासा प्यार कर
तू ही दिल में
दिल मुष्किल में
अब न दिल की मुष्किले बढा
|
मनसोक्त त्रास दे
मनसोक्त वार कर
सारे क्षम्य आहे
पण थोडेसे प्रेम कर
तूच अंतरी
अंतर अडचणीत
वाढवी न तू त्या अडचणी
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.