२०१५-१०-१९

गीतानुवाद-०६४: स्वप्नातल्या कळ्यांनो

मूळ मराठी गीतकार: मधुकर भावे, संगीतः अनिल अरुण, गायिकाः आशा

हिंदी अनुवादः नरेंद्र गोळे २००५०५०३


धृ
स्वप्नातल्या कळ्यांनो
उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची
लावील वेड जीवा
ख्वाबों की मल्लिकाओ
फुलो न तुम कभी भी
ये अधुरेपन आस ही
दीवानगी को लाई



रेखाकृती सुखाच्या
चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी
सहजी विरुनी गेल्या
कधी सोशिला उन्हाळा
कधी लाभला विसावा
सुख की कलाकृतीयाँ
दिल मे सजी सजाई
संभ्रमित खयालों से
ओझल सी हो गई
कभी धूप सह ली है
कभी राहत भी मिल गई



नैराश्य कृष्णमेघी
आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी
प्रीती फुलोनी यावी
काटयांविना न हाती
केव्हा गुलाब यावा
निराशा के कृष्णनभ मे
आशा कभी जो खोई
बिरहा मे भीगी भीगी
मिलने की बहार आई
काटोंबिना गुलाबी
कलियाँ न हाथ आई



सिद्धीस कार्य जाता
येते सुखास जडता
जडतेत चेतनेला
उरतो न कुणी त्राता
अतृप्त भावनांनी
जीवात जीव यावा
संपन्न कार्य हो जब,
सुख सुस्त दे दिखाई
चेतन को अचेतन मे
त्राता बचे न कोई
प्यासी ही भावना से
जीने मे जान आई



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.