मन डोले, मेरा तन डोले
मूळ हिंदी गीतः राजिंदर किशन, संगीतः हेमंतकुमार,
गायिकाः लता
चित्रपटः नागीण, सालः १९५४, भूमिकाः वैजयंतीमाला, प्रदीपकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१०१८
॥
धृ
॥
|
(मन
डोले मेरा तन डोले
मेरे
दिल का गया करार रे
ये कौन बजाये बांसुरिया) -२
|
(मन हरखे, माझे तन थिरके,
मज राहे मुळीच न थार
मुरली वाजवी कोण सुरात) -२
|
॥
१
॥
|
मधुर
मधुर सपनों में देखी
मैने
राह नवेली
छोड़ चली मैं लाज का पहरा
जाने
कहाँ अकेली
चली रे मैं जाने कहाँ अकेली
रस
घोले धुन यूँ बोले
जैसे ठंडी पड़े फुहार रे
ये कौन बजाये बांसुरिया
|
मधुर मधुर स्वप्नांत पाहिली
मी तर वाट नवी ही
सोडून सारी लाज आज
अशी एकटी जात कुठेशी
न जाणे एकटी जात कुठेशी
रस मिसळे, लय हे बोले
जणू रिमझिम झरत बहार
मुरली वाजवी कोण सुरात
|
॥
२
॥
|
कदम कदम पर रंग सुनहरा
ये
किसने बिखराया
नागन
का मन बस करने ये
कौन
सपेरा आया
न
जाने कौन सपेरा आया
पग डोले दिल यूँ बोले
तेरा होके रहा शिकार रे
ये कौन बजाये बांसुरिया
|
पदोपदी हा रंग कंचनी
कुणी हा पसरवला
नागिणीला ह्या वश करण्याला
कुठला गारूडी आला
न जाणे कुठला गारूडी आला
पद थिरके, मन हे बोले
तुझी होईल खचित शिकार
मुरली वाजवी कोण सुरात
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.