२०१३-०७-०९

गीतानुवाद-०२४: राह बनी खुद मंझील



मूल हिंदी गीत: कैफी आझमी, संगीत: हेमंतकुमार, गायक: हेमंतकुमार
चित्रपट: कोहरा, साल: १९६४, भूमिका: वहिदा रहमान, विश्वजीत, ललिता पवार

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००४०५१६

धृ
राह बनी खुद मंझिल,
पीछे रह गयी मुष्किल,
हाथ जो आए तुम
वाटच झाली इप्सित,
मागे पडले किल्मिष
साथ मिळालीस तू



देखो, फुल बनके,
सारी धरती, खिल पडी
गुजरे, आरजू के,
रास्तो से, दिस घडी
जिसने चुराए तुम
पाहा, पुष्प बनुनी,
सारी धरती, बहरली
गेले, दिस सारे,
अनुरक्तीच्या, पथी
त्यात हरवलीस तू



झरना, कह रहा है,
मेरे दिल की, दासताँ
मेरी, प्यास लेकर,
छा रही हैं, मस्तियाँ
जिनमें नहाए तुम
निर्झर, वदत आहे,
माझे मनची ही कथा
माझी, ओढ घेऊन,
विखुरलेली, ही मजा
त्यात नहालीस तू



पंछी, उड गये सब,
गाके नगमा, यार का
लेकिन, दिल ने ऐसा,
जाल फेका, प्यार का
उडने पाए तुम
पक्षी, सर्व उड्ले,
दिलवराचे गीत, गात
मात्र, मत्प्रितीने,
फेकला असा, प्रेमपाश
उडुही शकलीस तू





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.