२०१३-०७-०८

गीतानुवाद-०२३: ये मेरा दीवानापन है

मूळ हिंदी गीतकार: शहरयार, संगीत: शंकर जयकिसन, गायक: मुकेश,
चित्रपट: यहुदी, वर्ष: १९५८, भूमिका: सोहराब मोदी, दिलीपकुमार, मीनाकुमारी

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००४०५१०


ये मेरा दीवानापन है
हेच माझे वेड आहे



प्र
स्ता
दिल से तुझ को बेदिली है,
मुझ को है दिल का गुरूर
तू ये माने के माने,
लोग मानेंगे जुरूर
हृदयशून्य हृदयाप्रती तू,
मम गर्व सहृदयता असे
मान तू किंवा मानूस,
लोक हे करतील कबूल



धृ
ये मेरा दीवानापन है,
या मोहोब्बत का सुरूर
तू पहचाने, तो है ये
तेरी नजरों का कुसूर
हेच माझे वेड आहे,
वा प्रीती सौभाग्य हे
जाणसी ना तू जरी हे,
तर चुके तव दृष्टिकोन



दिल को तेरी ही तमन्ना,
दिल को है तुझ से ही प्यार
चाहे तू आए आए,
हम करेंगे इंतजार
हृदयी तुझीच आस आहे,
प्रेम तव हृदयाप्रती
तू जरी येशी, येशी,
मी तुझी प्रतीक्षा करेन



ऐसे विराने मे एक दिन,
घुट के मर जाएंगे हम
जितना जी चाहे पुकारो,
फिर नही आएंगे हम
ह्या अशा एकांतवासी,
गुदमरून संपेन मी
हाका जरी केला कितीही,
पुन्हा येईन मी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.