मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः चित्रगुप्त, गायकः किशोर
चित्रपटः एक राज़, सालः १९६३, भूमिकाः किशोर, जमुना
नरेंद्र गोळे २००८०५१६
पायल वाली देखना
|
पैंजणवाले जप जरा
|
|
लचकत चमकत चलत कामिनी
दधिगुन दमकत चपल दामिनी
ओ बाँवरी ओ साँवरी, अरी ओ चंचल
पल-छिन रुक जा, रुक जा रुक जा
|
लचकत मुरडत चाले कामिनी
दिपवत चमकत चपळ दामिनी
वो बावळी ओ सावळी अगं ए चंचल
क्षणभर थांब ना थांब ना थांब ना
|
|
॥
धृ
॥
|
पायल वाली देखना, यहीं पे कहीं दिल है,
पग तले आये ना
|
पैंजणवाले जप जरा, इथेच कुठे मन आहे,
पायतळी येवो ना
|
॥
१
॥
|
जैसे दामनिया बदरा में उड़े
कुछ दूर चले फिर जा के मुड़े
उठा रे नयन कजरारे
पर इतना समझ ले किसी की लगे हाये
न
|
जशी दामिनी ती, मेघांतून
उडे
थोडी चाले पुढे, हलकेच
वळे
उचल ए, नयन
तव काळे
पण एवढे समज की, कुणाची
लागो हाय ना
|
॥
२
॥
|
कित झूम चली मदिरा सी पिये
मतवारी पवन अचरा में लिये
ज़माना है यूँ ही मस्ताना
देखो जी कहीं ऋत बिना काली घटा
छाये न
|
कुठे जाशी अशी मदिराशी पिऊन
मदमस्त पवन पदरात भरून
आहे सारे जगच मस्तीभरे
पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना
|
॥
३
॥
|
कहीं ऐसा न हो कोई बात बने
अँगड़ाई मेरी तेरा नाच बने
नाचो री न बन के चकोरी
घूँघर कहीं धड़कन मेरी बन जाये न
|
कधी ऐसे न हो, काही
गोष्ट घडे
फिरकी ही माझी, तुझा
नाच बने
नाच ना, ना
बनून चकोरी
घुंगरू कधी, स्पंदन
माझे, होवोत ना
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.