२०१२-०४-०६

गीतानुवाद-००५: ऐ फुलों की रानी


फुलों की रानी

मूळ हिंदी गीत: हसरत जयपुरी, संगीत: शंकर जयकिसन, गायक: महंमद रफी
चित्रपट: आरजू, भूमिका: राजेंद्रकुमार, साधना, फिरोझखान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०६१६


अक्र


फुलों की रानी

सुमनांचे राणी

धृ
फुलों की रानी, बहारों की मलिका
तेरा मुस्कुराना, गजब हो गया
दिल होश में है, हम होश में हैं
नजर का मिलाना गजब हो गया
सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू
तुझे स्मितहास्य, कहर जाहले
मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी
कटाक्षांचे मिलन, कहर जाहले

तेरे होठ क्या हैं, गुलाबी कंवल हैं
ये दो पत्तियाँ प्यार की इक गजल है
वो नाजुक लबों से, मुहब्बत की बातें
हमीं को सुनाना, गजब हो गया
तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी
ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की
त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज
मला ऐकविणे, कहर जाहले

कभी खुल के मिलना, कभी खुद झिझकना कभी रास्तों पे बहकना, मचलना
ये पलकों की चिलमन, उठाकर गिराना गिराकर उठाना गजब हो गया
कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते
कधी चालतांना, बिथरणे, उसळणे
हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे
उतरून चढविणे, कहर जाहले

फ़िजाओं में ठंडक, घटा भर जवानी
तेरे गेसुओं की, बडी मेहेरबानी
हर एक पेंच में सैंकडो मैकदे हैं
तेरा लडखडाना गजब हो गया
ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र
तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही
ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी
तुझे धुंद होणे, कहर जाहले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.