२०२०-०९-०४

गीतानुवाद-१५५: झूम बराबर झूम शराबी

मूळ हिंदी गीतकारः नाझ शोलपुरी, संगीतः अझिज नाजाँ, गायकः अझिज नाजाँ
चित्रपटः फाईव्ह रायफल्स, सालः १९७४, भूमिकाः .एस.जोहर 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००३२१

प्रस्ताव

ना हरम में, ना सुकूँ मिलता है बुतखाने में
चैन मिलता है तो साक़ी तेरे मैखाने में

अंतःपुरी, सौख्य मिळते मंदिरातही जे
ते सौख्य कलाला, तुझ्या मद्यगृही बघ मिळते

॥धृ॥

झूम, झूम, झूम, झूम
झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम

झिंग झिंग, झिंग झिंग
झिंग बरोबर, झिंग मद्यप्या, झिंग बरोबर झिंग

॥१॥

काली घटा है, , मस्त फ़ज़ा है,
काली घटा है मस्त फ़ज़ा है
जाम उठाकर घूम घूम घूम
आज अँगूर की बेटी से मुहौब्बत कर ले
शेख साहब की नसीहत से बग़ावत कर ले
इसकी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया
ये तो अच्छा हुआ के अँगूर को बेटा ना हुआ
कमसे कम सूरत--साक़ी का नज़ारा कर ले
आके मैख़ाने में जीने का सहारा कर ले
आँख मिलते ही जवानी का मज़ा आयेगा
तुझको अँगूर के पानी का मज़ा आयेगा
हर नज़र अपनी बसद शौक़ गुलाबी कर दे
इतनी पीले के ज़माने को शराबी कर दे
जाम जब सामने आये तो मुकरना कैसा
बात जब पीने की आजाये तो डरना कैसा
धूम मची है, , मैख़ाने में,
धूम मची है मैख़ाने में
तू भी मचा ले धूम धूम धूम

काळी रात्र आहे , मस्त बहार आहे,
काळी रात्र आहे, मस्त बहार आहे
उचल पेला अन् फिर गिर गिर
आज द्राक्षाच्या कन्येवर तू प्रेम घे करून
शेख साहेबांच्या शिकवणीशी काडी घे मोडून
ह्याच्या कन्येने घेतली आहे शिरी दुनियेला
हे तर झाले बरे द्राक्षाला मुलगा झाला
कमीत कमी चेहर्याचे दर्शन घे कलालाच्या तू
येऊनी मद्यगृही दे आधार जीवनाला तू
नजरभेटीतच यौवनाची येईल बघ मजा
तुला द्राक्षाच्या रसाचीही येईल बघ मजा
हर कटाक्षास स्वतःच्याही गुलाबी कर तू
एवढी पी तू, सारे जगच मद्यपी कर तू
पेला येताच समोर, का उगा आढे वेढे
गोष्ट रसपानाची येता कशा म्हणून भ्यावे
धूम उसळली , मद्यगृही
धूम उसळली मद्यगृही
तू ही करून घे धूम धूम धूम

॥२॥

इसके पीनेसे तबीयत में रवानी आये
इसको बूढा भी जो पीले तो जवानी आये
पीने वाले तुझे आजाएगा पीने का मज़ा
इसके हर घूँट में पोशीदा है जीने का मज़ा
बात तो जब है के तू मै का परस्तार बने
तू नज़र डाल दे जिस पर वोही मैख़्वार बने
मौसम--गुल में तो पीने का मज़ा आता है
पीने वालों को ही जीने का मज़ा आता है
जाम उठाले, , मुँह से लगाले,
जाम उठाले, मुँह से लगाले
मुँह से लगाकर चूम चूम चूम

ह्या रसपानाने वृत्ती सार्या होती तल्लख
म्हातार्यानेही पिताच त्याला येतसे यौवन
पिणार्या रे तुला येईल पिण्याचीही मजा
ह्याच्या हर घोटातच साठवली जीवनाची मजा
यश तर तेव्हाच आहे जेव्हा तू आधीन होशील
दृष्टी टाकशील ज्यावर ते लगेच रसमय होईल
वसंत ऋतूत येतसे मजा पिण्याचीही
पिणार्यालाच येतसे मजा जगण्याचीही
पेला उचल, , तोंडाला लाव
पेला उचल, तोंडाला लाव
तोंडाला लावून चुंब चुंब चुंब

॥३॥

जो भी आता है यहाँ पीके मचल जाता है
जब नज़र साक़ी की पड़ती है सम्भल जाता है
इधर झूमके साक़ी का लेके नाम उठा
देख वो अब्र उठा तू भी ज़रा जाम उठा
इस क़दर पीले के रग-रग में सुरूर आजाये
कसरत मै से तेरे चेहरे पे नूर आजाये
इसके हर कतरे में नाज़ाँ है निहाँ दरियादिली
इसके पीनेसे पता होती है के ज़िन्दादिली
शान से पीले, , शान से जीले,
शान से पीले शान से जीले
घूम नशे में घूम घूम घूम

जो येतो इथे, पिऊन गुंगून जातो
दृष्टी कलालाची पडताच आणि सावरतो
ये इथे रंगूनी घेऊन कलालाचे नाव
सोड संकोच तू उचल पेला आणि मुखाला लाव
पी असे की चेतना नसानसात स्फुरो
ऊर्मीने द्राक्ष रसाच्या चेहरा उजळो
ह्याच्या हर थेंबात आहे सूप्तसा उदात्तपणा
हा पिण्याने सचेतनतेचाही कळे पत्ता
ऐटीत पी तू, , ऐटीत जग तू
ऐटीत पी तू, ऐटीत जग तू
फिर नशेत तू, फिर गिर गिर


https://www.youtube.com/watch?v=Lr3KyhK5ysw

२०२०-०९-०३

गीतानुवाद-१५४: हम तो तेरे आशिक हैं

मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायकः मुकेश, लता मंगेशकर
चित्रपटः फर्ज, सालः १९६७, भूमिकाः जितेंद्र, बबिता 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००८२५


धृ

हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने
चाहे तू माने, चाहे माने
हम भी ज़माने से हैं तेरे दीवाने
चाहे तू माने, चाहे माने

मी तर तुझा नादखुळा शतकानुशतके
मान हे हवे तर, मानसी तरिही
मी ही कधीचीच खुळी आहे तुझ्यावर
मान हे हवे तर, मानसी तरिही



आई हैं यूँ प्यार से जवानियाँ
अरमां दिल में है
दिल मुश्किल में है, जान--तमन्ना
तेरे इसी प्यार की कहानियाँ
हर महफ़िल में हैं
सबके दिल में हैं जान--तमन्ना
छेड़ते हैं सब मुझको अपने-बेगाने

आली असे प्रीतीने तरुणता
मनीषा मनात आहे
मन संकटात आहे, माझे सये
तुझ्या ह्या प्रीतीच्या कहाण्य़ा
सर्व स्थळांत आहेत
सर्व मनांत आहेत माझ्या सख्या रे
चिडवती मला सगळे, आपले नी परके



सोचो मोहब्बत में कभी हाथ से
दामन छूटे तो, दो दिल रूठे तो
तो फिर क्या हो
ऐसा हो काश कभी प्यार में
वादे टूटे तो, दो दिल रूठे तो
तो फिर क्या हो
हम तो चले आएं सनम तुझको मनाने

समज हातातून कधी प्रीतीत
सुटला जर हात तर, मने जर रुसली तर
तर काय होईल
प्रीतीत असे होवो कधी
शपथा तुटल्या तर, मने जर रुसली तर
तर काय होईल
मी तर इथे आलो आहे रुसवा काढायला



मस्त निगाहों से इस दिल को
मस्त बनाए जा, और पिलाए जा
प्यार के सागर
दिल पे बड़े शौक से सितमगर
ठेस लगाए जा, तीर चलाये जा
याद रहे पर
तीर कभी बन जाते हैं खुद निशाने

मस्त नयनांनी ह्या मनाला
मस्त करत जा आणि पाजत जा
प्रेमाचे प्याले
मनावर मोठ्या हौसेने कठोरा
घाव करत जा बाण मारत जा
लक्षात हे ठेव पण
बाण कधी होतात लक्ष्ये स्वतःच

 

https://www.youtube.com/watch?v=sIsleLQJ2N4

गीतानुवाद-१५३: चलो एक बार फिरसे

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायक: महेन्द्र कपूर
चित्रपटः गुमराह, सालः १९६३, कलाकारः अशोककुमार, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०४२३

प्र
स्ता

चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाये हम दोनो

चला एकवार पुन्हा
अपरिचित होऊ या आपण


धृ

न मैं तुमसे कोई उम्मीद
रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो
गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन
लड़खड़ाये मेरी बातों से
न ज़ाहिर हो तुम्हारी
कश्म-कश का राज़ नज़रों से

अपेक्षा ना मी ठेवावी
सांत्वनाची तुजकडूनी
नको माझ्याकडे पाहूस
तू संभ्रमी कटाक्षांनी
न माझी स्पंदने लय सोडू दे
माझ्याच शब्दांनी
न उघड हो गुपित तव
द्वंद्वाचे नजरांतून



तुम्हें भी कोई उलझन
रोकती है पेशकदमी से
मुझे भी लोग कहते हैं
कि ये जलवे पराए हैं
मेरे हमराह भी रुसवाइयां
हैं मेरे माझी की
तुम्हारे साथ भी गुज़री हुई
रातों के साये हैं

तुलाही काही अडचणी
रोखती व्यक्त होण्यातून
मलाही लोक म्हणती
ऐट ही, भासते परकी
माझ्या सोबतीस बदनामी आहे
माझ्या सहचराची
तुझ्यासोबतही गतरात्रींच्या
सावल्या असती

तार्रुफ़ रोग हो जाये
तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो
उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक
लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर
छोड़ना अच्छा

ओळखच रोग झाली तर
तिला विसरणे उत्तम
संबंध जर अवजड झाले तर
ते तोडणे चांगले
कहाणी जी परिणतीस आणणे
शक्य ना होई
तिला एका देखण्या वळणावरच
सोडणे चांगले

तार्रुफ़ = ओळख, ताल्लुक = संबंध, उलझन = अडचण,
दिलनवाजी = सांत्वना, धीर; कश्म-कश   = द्वंद्व
पेशकदमी = पुढाकार, रुसवाईयाँ = बदनामी

https://www.youtube.com/watch?v=wzbO1mjFPOM

२०२०-०९-०२

गीतानुवाद-१५२: खोया खोया चाँद

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः रफी
चित्रपटः काला बाजार, सालः १९६९, भूमिकाः देव आनंद, वहिदा रेहमान 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००६२५


धृ

खोया खोया चाँद
खुला आसमान
आँखों में सारी रात जाएगी
तुम को भी कैसे नींद आएगी

न ये चंद्रमा
खुले आसमान
न्याहळतच सारी रात जाईल ही
तुला तरी कैसी झोप येईल ती



मस्ती भरी हवा जो चली
खिल खिल गई यह दिल की कली
मन की गली में है खलबली
कि उनको तो बुलाओ

मस्तीभरी हवा चालली
खुलली कशी ही मनाची कळी
मनपंथी काय खळबळ झाली
की तिला तर बोलाव



तारे चले नजारें चले
संग संग मेरे वो सारे चले
चारों तरफ़ इशारे चले
किसी के तो हो जाओ

तारे आले नजारे आले
सोबत माझ्या हे सारे आले
चहूबाजूंना इशारे झाले
कुणाची तर तू हो ना



ऐसी ही रात भीगी सी रात
हाथों में हाथ होते वह साथ
कह लेते उन से दिल की यह बात
अबतो  सताओ

अशीच ही रात, भिजलेली रात
हातात हात, असता ती साथ
सांगू तिला का, मनची मी बात
नको आणखी सतावू



हम मिट चले जिन के लिए
बिन कुछ कहे वह चुप चुप रहे
कोई ज़रा यह उन से कहे
 ऐसे आज़माओ

झुरतो असा जिच्यासाठी मी
अबोलच अशी, ती चुप का बसे
कोणी तिला, सांगा की हे
अशी पारख मला तू


https://www.youtube.com/watch?v=MDDVLE7HV10