२०२५-१२-१२

गीतानुवाद-३२०: इतना तो याद है मुझे

मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायकः लता, मोहम्मद रफ़ी
चित्रपटः मेहेबूब की मेहेंदी, सालः १९७१, भूमिकाः राजेश खन्ना, लीना चंदावरकर 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०९२२

धृ

इतना तो याद है मुझे
, इतना तो याद है मुझे
हाय, इतना तो याद है मुझे
के उनसे मुलाक़ात हुई
बाद में जाने क्या हुआ
ना जाने क्या बात हुई

इतके तर आठवे मला
ओ, इतके तर आठवे मला
हाय, इतके तर आठवे मला
तिच्याशी मुलाखत झाली
झाले काय नंतर त्याच्या
न जाणे मग काय झाले

वादे वफ़ा के, करके, कसमें उठा के
किसी पे दिल लूटा के, चला आया
नज़रें मिलाके, नीँद अपनी गँवाके
कसक दिल में बसाके, चला आया
दिन तो गुज़र जायेगा
क्या होगा जब रात हुई

प्रेमाच्या शपथा, घेऊन, आश्वासने देऊन
मन कुणावर, ओवाळून, निघुन आलो
नजरांना निरखून, झोप आपली गमावून
पीड हृदयी ती घेऊन, निघुन आलो
दिस तर कसाही निघेल
काय होईल जेव्हा रात येईल

मारे हया के, मैं तो आँखे झुकाके
ज़रा दामन बचाके चली आयी
पर्दा हटाके उनकी बातों में आके
उन्हें सूरत दिखाके चली आयी
किस से शिक़ायत करूँ
शरारत मेरे साथ हुई

लाजेने भारून, मी तर डोळेही झुकवून
स्वतःलाच वाचवून, निघुन आले
पदर मी हटवून, त्यांच्या बोलण्यात येऊन
त्यांना चेहरा दाखवून, निघुन आले
तक्रार कुणाशी करू
खोडी तर माझी काढली

थी इक कहानी पहले ये ज़िंदगानी
उन्हें देखा तो जीना मुझे आया
दिल्बर-ओ-जानी, शर्म से पानी पानी
हुई मैं बस पसीना मुझे आया
ऐसे मैं भीग गयी जैसे के बरसात हुई

एवढीच कहाणी, आधी होती पुराणी
तिला पाहिले अन जगणे, मला आले
ए माझ्या प्रियकरा, होऊन चूरच लाजेने
मज घामच फुटलेला होता तेव्हा
भिजले अशी मी जणू, जसा की पाऊस झाला

२०२५-१२-०८

गीतानुवाद-३१९: हम थे जिनके सहारे

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः लता
चित्रपटः सफर, सालः १९७०, भूमिकाः शर्मिला, राजेश 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५१२०८


धृ

हम थे जिनके सहारे
वो हुए ना हमारे
डूबी जब दिल की नय्या
सामने थे किनारे

होते ज्यांचे आधारे
माझे ते नाही झाले
बुडली जव मनची नौका
समोरच होते किनारे

क्या मुहब्बत के वादे
क्या वफ़ा के इरादे
रेत की हैं दीवारें
जो भी चाहे गिरा दे

किती प्रेमविश्वास देणे
किती अर्पणे स्वनिष्ठा
वाळूच्या भिंती याही
तोडाव्या चाहे त्याने

है सभी कुछ जहाँ में
दोस्ती है, वफ़ा है
अपनी ये कमनसीबी
हमको ना कुछ भी मिला है

आहे विश्वात सारे
निष्ठा आहे मैत्र आहे
माझे नशीबच हे फुटके
काही मज ना मिळाले

यूँ तो दुनिया बसेगी
तनहाई फिर भी डसेगी
जो ज़िंदगी में कमी थी
वो कमी तो रहेगी

तसे जग पुन्हाही वसेल
एकटेपणही जाणवेलच
उणीव होती जीवनी जी
ती उणीव तर राहीलच