२०२५-०१-१३

गीतानुवाद-३०९: आ जा आई बहार

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः राजकुमार, सालः १९६५, भूमिकाः साधना, शम्मीकपूर 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०११२


धृ

आ जा आई बहार
दिल है
बेक़रार ओ मेरे
राजकुमार, तेरे बिन रहा न जाए

ये रे आली बहार
मन हे
बेचैन रे माझ्या
राजकुमार, तुजविण रहावत ना

जुल्फ़ों से जब भी, चले पुरवाई
तन मेरा टूटे
आयी अंगड़ाई
देखूँ बार बार, तेरा
इन्तज़ार ओ मेरे
राजकुमार, तेरे बिन रहा न जाए

केसांतून जेव्हा, वाहे हवा ही
तन माझे फिरते
घेते अन्‌ गिरकी
पाहू वारंवार, वाट
तुझी राजसा
राजकुमार, तुजविण रहावत ना

मन मे सुनू मैं, तेरी मुरलिया
नाचूँ मैं छम-छम
बाजे पायलिया
दिल का तार-तार
तेरी करे पुकार ओ मेरे
राजकुमार, तेरे बिन रहा न जाए

मनातच ऐकू, मुरली तुझी रे
नाचू मी छाम छम
वाजे पायल ही
मनाची, गुंजे
तार तुज पुकारे, रे माझ्या
राजकुमार, तुजविण रहावत ना

जल की मछरिया, जल मे है प्यासी
खुशियों के दिन हैं
फिर भी उदासी
लेकर मेरा प्यार, आ जा
अब के बार ओ मेरे
राजकुमार, तेरे बिन रहा न जाए

मासोळी जळीची, तहानली त्यातच
खुशीचे हे दिस परी
तरीही उदासी
घेऊन माझे प्रेम, ये रे
आता तरी, राजसा
राजकुमार, तुजविण रहावत ना

२०२५-०१-१२

गीतानुवाद-३०८: इस दुनिया में जीना हो तो

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिशन, गायकः लता मंगेशकर
चित्रपटः गुमनाम, सालः १९६५, भूमिकाः मनोजकुमार, नंदा, हेलन, प्राण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०१०९


धृ

इस दुनिया में जीना हो तो
सुन लो मेरी बात
ग़म छोड़ के मना लो
रंग रेली
और मान लो
जो कहे किट्टी केली

रहायचे या जगी असेल तर
ऐका माझे म्हणणे
विसरून दुःख, करा साजरे
सौख्यच सारे इथले
आणि ऐका सांगू पाहे
किट्टी केली जे जे

जीना उसक जीना है
जो हँसते गाते जीले
ज़ुल्फ़ों की घनघोर घटा में
नैन के बादल पीले
ऐश के बंदों ऐश करों तुम
छोड़ो ये ख़ामोशी
आई हैं रंगीन बहारें
लेकर दिन रंगीले

जीणे त्याचे जीणे आहे
जो सुखात जगतो सारे
केसांच्या घनघोर काजळीत
जलद नेत्रीचे पिवळे
चैनकरांनो चैन तुम्ही करा
सोडा मौनही आपले
आली रंगीत बहार आहे
घेऊन दिन रंगीले

मैं अलबेली चिंगारी हूँ
नाचूँ और लहराऊँ
दामन दामन फूल खिलाऊँ
और ख़ुशियाँ बरसाऊँ
दुनिया वालों तुम क्या जानो
जीने की ये बातें
आओ मेरी महफ़िल में
मैं ये दो बातें समझाऊँ

मी तर अवखळ ठिणगी आहे
नाचू, गिरकी घेऊ
इथेतिथे मी फुलेच फुलविन
आणि खुशी वर्षाविन
संसार्‍यांनो तुम्हा न माहीत
जगण्याच्या या गोष्टी
या हो माझ्या मैफिलीत
तुम्ही सांगे मी त्या युक्ती

२०२५-०१-११

गीतानुवाद-३०७: धीरे धीरे मचल ऐ

मूळ हिंदी गीतः कैफी आझमी, संगीतः हेमंतकुमार, गायकः लता
चित्रपटः अनुपमा, सालः १९६६, भूमिकाः सुरेखा, तरूण बोस 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०१११


धृ

धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार
कोई आता है
यूँ तडप के ना तडपा मुझे बार बार
कोई आता है

हळू हळूच उसळ ए मना दुर्निवार
कोणी येतो आहे
तळमळून तू नको जागवू वारंवार
कोणी येतो आहे

उसके दामन की खुशबू हवाओं में है
उसके कदमों की आहट फजाओं में है
मुझको करने दे, करने दे, सोलह सिंगार

त्याच्या वस्त्रांचा गंधच हवेवर आहे
पदरवाचीही चाहूल रवांवर आहे
मला होऊ दे होऊ दे पुरती तयार

मुझको छूने लगी उसकी परछाईयाँ
दिल के नजदीक बजती हैं शहनाईयाँ
मेरे सपनों के आँगन मे गाता है प्यार

मला स्पर्शू बघे त्याची छाया इथे
हृदयाशी या सनई का ही गुंजते
अंगणी माझ्या स्वप्नात गाते प्रीती

रूठ के पहले जी भर सताऊँगी मैं
जब मनायेंगे वो, मान जाऊँगी मैं
दिल पे रहता है ऐसे में कब इख्तियार

रुसून आधी मनभर मी देईन त्रास
मनधरणीस लागेल तर मानेन त्या
अशा वेळी मनावर का राहतो ताबा