सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो
मूळ हिंदी कवीः निदा फाजली
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०८२१
धृ
|
सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो सभी हैं भीड़ में तुम भी निकल सको तो चलो
|
वाटेत ऊन तर असेल तरीही चलत असलास तर चल गर्दीत सर्वच आहेत तूही चलत असलास तर चल
|
१
|
इधर उधर कई मंज़िल हैं चल सको तो चलो बने बनाये हैं साँचे जो ढल सको तो चलो
|
इथे तिथे खूप स्थळे आहेत चलत असलास तर चल घडवलेले साचे आहेत त्यात घडू शकलास तर चल
|
२
|
किसी के वास्ते राहें कहाँ बदलती हैं तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो
|
कुणासाठी रस्ते कधी बदलतात का स्वतःलाच जर बदलवू शकलास तर चल
|
३
|
यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता मुझे गिराके अगर तुम सम्भल सको तो चलो
|
इथे कुणी कुणाला रस्ता देत नाही मला पाडूनही जर तू सावरू शकलास तर चल
|
४
|
यही है ज़िन्दगी कुछ ख़्वाब चन्द उम्मीदें इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो
|
हेच तर जीवन आहे काही स्वप्ने काही उमेदी याच खेळण्यांत मन रमवू शकलास तर चल
|
५
|
हर इक सफ़र को है महफ़ूस रास्तों की तलाश हिफ़ाज़तों की रिवायत बदल सको तो चलो
|
प्रत्येक प्रवासाला सुरक्षित रस्त्यांचा शोध असतो सुरक्षिततेची व्याख्याच बदलवू शकलास तर चल
|
६
|
कहीं नहीं कोई सूरज धुआँ धुआँ है फ़िज़ा ख़ुद अपने आप से बाहर निकल सको तो चलो
|
कुठे कुणी सूर्य नाही धूसर धूसर आहे हवा स्वतःच्याच बाहेर पडू शकलास तर चल
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.