२०२३-११-१५

गीतानुवाद-२८५: आए बहार बन के लुभा कर चले गए

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मोहम्मद रफ़ी
चित्रपटः राज हठ, सालः १९५६, भूमिकाः मधुबाला, प्रदीपकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१११५

 

धृ

आए बहार बन के
लुभा कर चले गए
क्या राज़ था जो दिल में
छुपा कर चले गए

आली, बहार झाली
मोहवून ती गेली
कसले रहस्य अंतरी
लपवून गेली ती

कहने को वो हसीन थे
आँखें थीं बेवफ़ा
दामन मेरी नज़र से
बचा कर चले गए

सांगायचे तर सुंदर
होती, डोळे तिचे फितूर
पदरास नजरेतून
वाचवून ती गेली

इतना मुझे बताओ
मेरे दिल की धड़कनों
वो कौन थे जो ख़्वाब
दिखाकर चले गए

एवढे मला सांगा
स्पंदनांनो मम जरा
कोण होती ती जी स्वप्न
दाखवून हरवली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.