२०२३-१०-२९

गीतानुवाद-२८३: ठण्डी हवाएं लहराके आएं

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सचिन देव बर्मन, गायकः लता मंगेशकर
चित्रपटः नौजवान, सालः १९५१, भूमिकाः नलिनी जयवंत, प्रेमनाथ 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१०२९


धृ

ठण्डी हवाएं, लहराके आएं
रुत है जवां, उनको यहाँ, कैसे बुलाएं

वारे गार आहे, झुळूक वाहताहे
ऋतू आहे युवा, कसे साजणा, बोलवावे

चाँद और तारे, हँसते नज़ारे
मिलके सभी, दिल में सखी, जादू जगायें

चंद्र आणि तारे, हसरे देखावे
सारे मिळून, मनातच सये, जादू करे हे

कहा भी ना जाये, रहा भी ना जाये
तुमसे अगर, मिले भी नज़र, हम झेंप जाएं

सांगू न शकते, राहू न शकते
तुझ्याशी जवा, जुळते नजर, मी लाजताहे

दिल के फ़साने, दिल ही ना जाने
तुमको सजन, दिल की लगन, कैसे बतायें

मनाच्या कहाण्या, मनही जाणते ना
तुला साजणा, मनाची व्यथा, सांगू कशी रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.