२०२२-०७-१६

गीतानुवाद-२४९: बेख़ुदी में सनम उठ गए जो क़दम

मूळ हिंदी गीतः अख्तर रोमनी, संगीतः कल्याणजी आनंदजी, गायक: लता, रफी
चित्रपटः हसीना मान जायेगी, सालः १९६८, भूमिकाः शशी कपूर, बबिता, अमित, जॉनी वॉकर

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५१० 

धृ

बेख़ुदी में सनम उठ गए जो क़दम
आ गए आ गए आ गए पास हम
आ गए पास हम
बेख़ुदी में सनम उठ गए जो क़दम
आ गए आ गए आ गए आ गए पास हम

लः


रः

भान नव्हते तरी, उचलली पावले
हरखलो, हरखलो, जवळ आलो असे
जवळ आलो असे
भान नव्हते तरी, उचलली पावले
हरखलो, हरखलो, जवळ आलो असे

आग ये कैसी मन में लगी है
मन से बढी तो तन में लगी है
आग नहीं ये दिल की लगी है
जितनी बुझाई उतनी जली है
दिल की लगी ना हो तो क्या ज़िन्दगी है
साथ हम जो चले मिट गए फ़ासले
आ गए आ गए आ गए पास हम
बेख़ुदी में सनम

लः

रः

लः


दो
:

आग कशी ही मनी लागली आहे
मनी वाढली तर तनी लागली आहे
आग नाहीच ही ध्यास मनीचा
शांतवा जेवढा, वाढतो तेवढा
ध्यास मुळीही नसता, काय आयुष्य ते
साथ जे चाललो, दूरता संपली      
हरखलो, हरखलो, जवळ आलो असे
भान नव्हते तरी

खोई नज़र थी सोए नज़ारे
देखा तुम्हें तो जागे ये सारे
दिल ने किए जो दिल को इशारे
मिल के चले हम साथ तुम्हारे
आज ख़ुशी से मेरा दिल ये पुकारे
तेरा दामन मिला प्यार मेरा खिला
आ गए आ गए आ गए पास हम
बेख़ुदी में सनम

रः


लः



दो
:

हरपलेली नजर, देखावे सुप्त ते
पाहिले तुला अन्, सारे जग जागले
हृदयाने केले जे हृदया इशारे
मिळून चालू दोघे चलू सोबतीने
आज खुशीने माझे हृदय हे पुकारे
आधाराने तुझ्या प्रेम हे बघ फुले
हरखलो, हरखलो, जवळ आलो असे
भान नव्हते तरी

दिल की कहानी पहुँची ज़ुबाँ तक
किसको ख़बर अब पहुँचे कहाँ तक
प्यार के राही आए यहाँ तक
जाएँगे दिल की हद है जहाँ तक
तुम साथ दो तो चलें हम आसमाँ तक
दिल में अरमाँ लिए लाखों तूफ़ाँ लिए
आ गए आ गए आ गए पास हम
बेख़ुदी में सनम

लः


रः


लः
दो:

गोष्ट हृदयातली, ओठांवरती आली
कुणा ठाऊकी कुठवर पोहोचेलही ती
प्रीतपांथस्थ हे पावले इथवरी
जाऊ तिथवर जिथे हद्द हृदयाची हो
साथ तू देशी तर येईन आकाशीही मी
अंतराशा घेऊन वादळे साठवून
हरखलो, हरखलो, जवळ आलो असे
भान नव्हते तरी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.