२०२२-०६-०७

गीतानुवाद-२४७: पूछो ना कैसे

मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: सचिनदेव बर्मन, गायक: मन्ना डे
चित्रपटः मेरी सूरत तेरी आँखे, साल: १९६३, भूमिका: अशोककुमार, आशा पारेख, प्रदीपकुमार 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०२०४

धृ

पूछो ना कैसे मैने रैन बिताई
इक पल जैसे, इक युग बीता
युग बीते मोहे नींद ना आयी
पूछो ना कैसे मैने रैन बिताई

पूसू नका कशी रात गुजरली
एक क्षण जैसे एक युग गेले
युगं गेली तरी नीज न आली
पूसू नका कशी रात गुजरली

उत जले दीपक, इत मन मेरा
फिर भी ना जाये मेरे घर का अंधेरा
तड़पत तरसत उमर गंवायी
पूछो ना कैसे मैने रैन बिताई

तिथे जळे दिवा, इथं मन माझे
तिमिर सोडं ना तरी घर माझे
अस्वस्थ अतृप्त जीवन सरले
पूसू नका कशी रात गुजरली

ना कहीं चँदा, ना कहीं तारे
ज्योत के प्यासे मेरे, नैन बिचारे
भोर भी आस की किरन ना लायी
पूछो ना कैसे मैने रैन बिताई

चंद्र कुठेही न, न कुठेही तारे
किरण शोधती नयन बिचारे
पहाटही घेऊन आस न आली
पूसू नका कशी रात गुजरली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.