२०२२-०६-०५

गीतानुवाद-२४६: कौन आया की

मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीत: रवी, गायक: आशा भोसले
चित्रपट: वक्त, साल: १९६५, भूमिका: राजकुमार, साधना 

मराठी अनुवाद:  नरेंद्र गोळे २०१३०७०५


धृ

कौन आया की निगाहों में चमक जाग उठी
दिले के सोये हुए तारों मे खनक जाग उठी

कोण आले नी नयनांत चमक जागली
सूप्त तारांत मनाच्याही खनक जागली

किस के आने की खबर लेकर हवाएँ आयी
जिस्म से फूल चटकने की सदाएँ आयी
रूह खिलने लगी, सासों में महक जाग उठी
दिले के सोये हुए तारों मे खनक जाग उठी

बातमी येण्याची कोणाच्या हवेवर आली
तनूवर फूल फिरवल्याची चाहूल आली
चित्त हरखले, श्वासांत आला सुगंधही
सूप्त तारांत मनाच्याही खनक जागली

किस ने ये देख के मेरे तरफ बाहे खोली
शौख जज्बात ने सीने में निगाहे खोली
होठ तपने लगे, जुल्फों मे लचक जाग उठी
दिले के सोये हुए तारों मे खनक जाग उठी

कुणी पाहून हे मजपाशी याचना केली
तीव्र आवेगांनी हृदयात दृष्टी जागवली
ओठ उष्णावले, केसांत लहर धावली
सूप्त तारांत मनाच्याही खनक जागली

किस के हाथों ने मेरे हाथों से कुछ मांगा है
किस के ख्वाबों ने मेरी रातों से कुछ मांगा है
साज बजने लगे, आँचल में धुनक जाग उठी
दिले के सोये हुए तारों मे खनक जाग उठी

कुणाच्या हातांनी मजकडून याचले काही
कुणाच्या स्वप्नांनी रातीस याचले काही
वाद्ये नादावली, पदरात गुंज गाजली
सूप्त तारांत मनाच्याही खनक जागली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.