२०२२-०५-३१

गीतानुवाद-२४४: मचलती आरज़ू खड़ी बाँहें पसारे

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सलील चौधरी, गायकः लता
चित्रपटः उसने कहा था, सालः १९६०, भूमिकाः नंदा, सुनील दत्त

 

धृ

मचलती आरज़ू खड़ी बाँहें पसारे
ओ मेरे साजना रे, धड़कता दिल पुकारे
आ आ आ जा

उसळती कामना, उभी पसरून बाहू
रे माझ्या साजणा रे, स्पंदते हृदय बोले
ये ना राजसा

मेरा आँचल पकड़के कह रहा है मेरा दिल
ज़माने की निगाहों से
यहाँ छुप-छुप के मिल
यहीं तन्हाई में दिल की कली जाएगी खिल

पदर माझाच उचलून, बोलते हृदय माझे
जगापासून लपुनी,
येऊन भेट येथे
, ये
इथे एकांती येऊन कळी मनाची उमले रे

मिलन के मदभरे चंचल ख़यालों में मगन
मैं यूँ तकती हूँ तेरी राह, ओ मेरे सजन
बहारों के लिए हो मुंतज़िर जैसे चमन

भेटीच्या मत्त विचारांत होते मी तल्लीन
अशी पाहत असे, माझ्या सख्या, तव वाट रे
जसे ते फूल होई, अधीर बहार येण्यासाठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.