मूळ हिंदी गीतः साहीर, संगीतः रवी, गायिकाः लता
चित्रपटः आँखे, सालः १९६८, भूमिकाः माला सिन्हा, धर्मेंद्र
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५३१
॥
धृ
॥
|
मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी-कभी
होती है दिल्बरों की इनायत कभी-कभी
|
मिळते रे जीवनात ही प्रीती कधी-कधी
होते रे प्रियाची बहाल मर्जी कधी-कधी
|
॥
१
॥
|
शर्मा के मुँह न फेर नज़र के सवाल पर
लाती है ऐसे मोड़ पर क़िस्मत कभी-कभी
|
नेत्रीच्या प्रश्नावर नको लाजून फिरवू मुख
वळणावर आणते अशा, दैवही कधी कधी
|
॥
२
॥
|
खुलते नहीं हैं रोज़ दरिचे बहार के
आती है जान-ए-मन ये क़यामत कभी-कभी
|
उलगडती रोज ना मुळी बहारीचे गालीचे
येते ही जिवलगा पहा पर्वणी कधी कधी
|
॥
३
॥
|
तनहा न कट सकेंगे जवानी के रास्ते
पेश आएगी किसीकी ज़रूरत कभी-कभी
|
ना एकट्याने यौवनी, पथ संपतो कधी
संगत जरूर भासते कुणाची कधी कधी
|
॥
४
॥
|
फिर खो न जाएं हम कहीं दुनिया की भीड़ में
मिलती है पास आने की मुहलत कभी-कभी
|
गर्दीत आपली ह्या पुन्हा होवो न ताटातूट
मिळते रे जवळ येण्याची सवलत कधी कधी
|
॥
५
॥
|
होती है दिलबरों की इनायत कभी-कभी
मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी
|
होते रे प्रियाची बहाल मर्जी कधी-कधी
मिळते रे जीवनात ही प्रीती कधी-कधी
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.