संघ प्रार्थना
वृत्तः भुजंगप्रयात
मूळ संस्कृत संहिताः नरहरी नारायण भिडे,
फेब्रुवारी १९३९, प्रथम प्रस्तुतीः संघशिक्षावर्ग पुणे
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१९१००१
॥
१ ॥ |
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते |
नमू मायभूमी तुला प्रीय माते
सुखी मी करावे तुला हिंदुभूमे
शिवे पुण्यभूमे तुझ्याकारणे गे
पडो देह माझा नमू मायभू हे
|
॥
२ ॥ |
प्रभो शक्तिमन्
हिन्दुराष्ट्रांगभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभामाशिषं देहि तत्पूर्तये |
प्रभो शक्तिशाली, मुले हिन्दुभूची
असू सिद्ध आम्ही तुझ्या अर्चनेसी
तुझ्या कार्यि आहोत बांधील आम्ही
कृपा राहु दे कार्य ते साधण्यासी
|
॥
३ ॥ |
अजय्यां च विश्वस्य देहीश
शक्तिम्
सुशीलं जगद् येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत् कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत् |
न हारू जगाला अशी शक्ति दे तू
जगा नम्रता दे, असे शील दे तू
असे मार्ग काट्याकुट्यांचा कसाही
जरी ऐकलेला, भला, घेतला मी
|
॥
४ ॥ |
समुत्कर्ष
निःश्रेयसस्यैकमुग्रम्
परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम् |
समुत्कर्ष होवो नको श्रेय त्याचे
अशा जाणिवेने स्फुरो वीरवृत्ती
न हो क्षीण, ऐसीच दे ध्येयनिष्ठा
सदा जागती राहु दे अंतरी ती
|
॥
५ ॥ |
विजेत्री च नः संहता
कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वाशिषा ते भृशम् |
विजेती असो संहता कार्यशक्ती
सदा धर्म राखावया सिद्ध हो जी
महा वैभवी राष्ट्र नेण्यास तू हे
असू दे कृपा खूप सामर्थ्यदा ती
|
॥ भारत माता की जय ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.