२०१८-१२-०८

गीतानुवाद-१२१: नैनों में बदरा छाए


मूळ हिंदी गीतकारः राजा मेहंदी अली खान, संगीतः मदन मोहन, गायिकाः लता मंगेशकर
चित्रपटः मेरा साया, सालः १९६३, भूमिकाः सुनील दत्त, साधना

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०३१४

धृ
नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाए
ऐसे में बलम मोहे, गरवा लगा ले

डोळ्यांत दाटून आले, वीजेगत ते चमके हाए
अशातच मला तू सजणा, जवळी धरी रे
मदिरा में डूबी अँखियाँ
चंचल हैं दोनों सखियाँ
ढलती रहेंगी तोहे
पलकों की प्यारी पखियाँ
शरमा के देंगी तोहे
मदिरा के प्याले

मदिरेत बुडले डोळे
चंचल हे सुहृद झाले
मिटू पाहती तुजसाठी
पापण्यांची प्रिय ही पाखे
लाजून देतील तुज हे
मदिरेचे प्याले
प्रेम दीवानी हूँ में
सपनों की रानी हूँ मैं
पिछले जनम से तेरी
प्रेम कहानी हूँ मैं
आ इस जनम में भी तू
अपना बना ले

प्रेमाची वेडी आहे मी
स्वप्नांची राणी आहे मी
गेल्या जन्मापासूनची
प्रेम कहाणी आहे मी
ये ह्या जन्मीही तू मला
आपले करून घे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.