पुष्पदंत विरचित
शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद
(० हा श्लोक
शार्दुलविक्रीडितात आहे, १ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत, अक्षरे-१७, यती-६,११)
मराठी अनुवादः नरेंद्र
गोळे २०२४०३०८ महाशिवरात्र)
० |
वन्दे देव उमापतिं सुरगुरूं वन्दे जगत्कारणम् |
वंदू देव
उमापती सुरगुरू वंदू जगत्कारणा वंदू सर्पसराधरा
मृगधरा वंदू पशूंचा पती वंदू
सूर्यशशांक नेत्रि धरत्या वंदू मुकुंदप्रिया वंदू
भक्तजनाश्रया वरद या वंदू शिवा शंकरा |
१ |
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी |
तुझा
ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता स्तुती
ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता मला वाटे
गावे अवगत जसे स्तोत्र तव ते शिवा
स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे |
२ |
अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः |
मनाने
वाचेने कथुन महिमा ना सरतसे श्रुती
नाही, नाही, विवरण असे देत असते परी
साकाराचे किति गुण कथू लोक म्हणती मनाला
वाचेला न कळत परी चित्र रचती |
३ |
मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः |
कशी वाणी
केली सुरस अति तू निर्मित अशी तुला
ब्रम्हा किंवा सुरगुरुस्तुतीही न रिझवी नसो
आश्चर्याचे, तरि करत मी वर्णन तुझे शिवा माझी
बुद्धी गुणकथन पुण्यात रमते |
४ |
तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत् |
जगाची
उत्पत्ती, स्थिति, विलय देवा घडवसी तुझे हे
ऐश्वर्य, सत-रज-तमा दे परिणती मनोहारी
भासे वरद तव हे रूप बरवे न रूपा
जाणूनी, जड जन पहा क्षोभ करती |
५ |
किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं |
निराकाराने
हे जगत सगळे काय घडले तया आधाराला
सृजन कसले साधन ठरे तुझे हे
ऐश्वर्य न कळत असे लोक सगळे कुतर्कांनी
होती मुखर, करण्या मोहित मते |
६ |
अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगतां |
न का
ईशावीणा जग घडवणे संभव असे न का
आधाराची गरजच तया भासत असे कुतर्काने
ऐशा कलुषितच ज्यांचे मन अती तुझ्या
लीलांनाही बघुन न असे मान्य म्हणती |
७ |
त्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति |
असो
सांख्यांचेही, शिवमत व विष्णूप्रिय जरी अशा
मंतव्यांना हितकर असे मार्ग मिळती रुची
वैविध्याने अवघड, सुधे पंथ धरती परी सार्यांनाही,
तव वरच वाटे परिणती |
८ |
महोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः |
कपाली, संपत्ती,
परशु, जिन, सर्पादि, भस्मे तुझ्या
संसाराचा रथ फिरत त्यांचेसह असे सुरांना
लाभे श्री, लव उचलिता तूच भुवई कळे ज्याला
त्याला, विषय सगळे ना भ्रमवती |
९ |
ध्रुवं कश्चित सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं |
जगा काही
नाशी, म्हणत अविनाशी जग कुणी विचारांचा ऐशा
असत सगळा गोंधळ जगी तरीही
पाहोनी जग स्तिमित लीलेत तुझिया स्तुती
वाचेने ही, उगंच नच वाचाळपण हे |
१० |
तवैश्वर्यं यत्नाद् यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः |
तुला ब्रम्हाविष्णू
हुडकत वरी आणिक तळी तिथे नाही
नाही म्हणत मग झाले चकितही तुझ्या
ऐश्वर्याने स्तिमित करती कौतुक तुझे शिवा
भक्तीश्रद्धा धरुन मिळसी निश्चितपणे |
११ |
अयत्नादासाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं |
तया
लंकेशाचे स्फुरण सरल्यावीण सहजी जरा ना
झुंझूनी पदरि पडले विश्वच तया शिरोपद्मांची
जो चरणि रचुनी रास, भजतो तयाला
दुस्साध्य शिव न जगती ठेवत गती |
१२ |
अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं |
अशा
लंकेशाने न स्मरत कृपा धीर करुनी बळाने
कैलासा हलवुन तुला नेऊ म्हटले तवा
पाताळाचे तळि सहज त्याला दडपले तिथेही
मोहाने तववरकृपे, तो न बधला |
१३ |
यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सतीं |
तुझ्या
आशीर्वादे अधिपति असा बाण सजला तिन्ही लोकी
त्याने जय मिळवुनी राज्य रचले तुझ्या ठायी
श्रद्धा असुन मनु पूजा तव करे तया नाही
नाही अवनति मुळी ठाउक असे |
१४ |
अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा |
जवा
ब्रम्हांडाचा क्षय समिप देवासुर जगा त्रिनेत्राने
विश्वा अभय दिधले प्राशुन विषा तये नीळ्या
कंठा मिरवत असे शंकर सदा जगाला तो
वाटे खरच जगदुद्धार करता |
१५ |
असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे |
जयाला
पाहोनी तुज वगळता देव सगळे असो वा
दैत्यादी मनुज अवघे विद्ध असती अशा
कंदर्पाला दहन करुनी सिद्ध करसी कधीही
श्रेष्ठांना दुखवुन नसे श्रेय जगती |
१६ |
मही पादाघाताद् व्रजति सहसा संशयपदं |
तुझ्या पादाघाते थरथरत पृथ्वी थिरकता |
१७ |
वियद्व्यापी तारागणगुणितफेनोद्गमरुचिः |
जगाला
द्वीपाचे रुप मिळत धारेतच जिच्या अशा
गंगेलाही अवतरत माथ्यावर तुझ्या मिळे
बिंदू जागा, बघुन तव देवा मिति कळे |
१८ |
रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो |
धरेला
चंद्रार्का करुन विधि चाके निघतसे धनुष्या
मेरूच्या हरिस शर योजे, शिव वधे असा काही
मोठा त्रिपुर नव्हता थोर वधण्या तरी शंभोची ही
उमजत नसे काय किमया |
१९ |
हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयोः |
हरी देई
डोळा कमलसहस्रा पूर्ण करण्या जगा
रक्षायाला त्रिपुरहर वृत्तीच धजते |
२० |
क्रतौ सुप्ते जाग्रत्त्वमसि फलयोगे क्रतुमतां |
परीत्यागाला
बा सहज फळ लाभो म्हणुन तू |
२१ |
क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृता- |
जरी होता
दक्ष यजनकरता तज्ञ अगदी ऋषींच्या
साह्याने सुरगणसहाय्ये यजत तो तरी
विध्वंसूनी यजन सगळे सिद्ध करसी विनाश्रद्धा,
कर्त्या, यजनहि मुळी साधत नसे |
२२ |
प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं |
प्रजेचाही स्वामी
भुलुन पद मोहात पडला मुलीच्याही
मागे फिरत वनि व्याधास दिसला शिवा वेधूनी
त्या भयचकित केले तूच जगती स्थिती ती
आकाशी मिरवत मृगा होऊन विधी |
२३ |
स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत् |
स्वसौंदर्यगर्वे
मदन सजला युद्ध करण्या तया पाहूनी
त्वा त्वरित वधिले भस्म उरण्या उमेला
मोहूनी शिव वसवि अंगात अरध्या असे नाही,
त्याचेवरचि युवती मुग्ध असती |
२४ |
श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः |
स्मशानीची
क्रीडा, स्मरहर पिशाच्चे सहचरे चिताभस्मालेपासहित
नरमुंडे तव गळा अशूभाची
शीले तव असत नावात सगळ्या तरीही
मानाने शुभकर असा तूच अससी |
२५ |
मनः प्रत्यकचित्ते सविधमवधायात्तमरुतः |
जरी
प्राणायामे विधिवत तुझा ध्यास धरुनी यशाच्या
आनंदे स्फुरित अश्रु गाळीत जगी तुला
पाहोनीही अनुभवत सौख्यामृतमयी अशा
सर्वांचे ईप्सितचहि शिवा काय नससी |
२६ |
त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवह- |
शिवा सूर्य,
चंद्र, पवन, अनली, तूच अससी जले तू,
आकाशी, अवनिभरही, तूच गमसी असे छोटे
मोठे, विवरण तुझे, नांदत इथे जिथे तू
नाही ते, स्थळ नच अम्हा ज्ञात असते |
२७ |
त्रयीं तिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा- |
तिन्ही वेदं, वृत्ती, भुवनत्रय, ते देव तिनही |
२८ |
भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहा |
तुला रुद्रा,
शर्वा, भव वदत, तू ऊग्र अतिची महादेवा,
भीमा, पशुपति, असे लोक म्हणती तुझ्यातूनी
सारे निगम जणु संचार करती अशा शंभो
माझे नमन तव ठायी रुजु असो |
२९ |
नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः |
नमू या
प्रीयाला विजनवनप्रीयास नमु या |
३० |
बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः |
जग रजरसे,
साकारीसी, तुला नमु या भवा तम गुण कृते,
संहारीसी, तुला नमु या हरा सत गुण रुपे,
सांभाळीसी, तुला नमु या मृडा अससि तरिहि,
निर्गुणी तू, तुला नमु या शिवा (हरिणीः १७-
न स म र स लगा, यतीः ६,४,७) |
३१ |
कृशपरिणतिचेतः क्लेशवश्यं क्व चेदं |
जडतर मन
माझे, पार शोधी गुणांचा कुठवर शिव
सीमा, ठाव घे मी भवाचा परि चकित
मनाला थांग नाही कळाला वरद चरणि
वाहू वाक्यपुष्पे तयाला (मालिनीः
१५- न न म य य, ८,७) |
३२ |
असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे |
करुन दउत
सिंधू,
मेरुच्या तुल्य शाई करुन
सुरतरूची लेखणी, पत्र भू ही सरस्वति
लिहि स्तोत्रे, सारखी सर्वकाळ स्तवन तरि न
शंभो संपते, तू अकाल (मालिनी) |
३३ |
असुरसुरमुनीन्द्रैरर्चितस्येन्दुमौले- |
सुर असुर
मुनींनी अर्चिला चंद्रमौली लिहित गुण
महीमा निर्गुणी विश्वव्यापी निरुपण
गणमुख्ये पुष्पदन्ते रचीले सुरस कथन
केले दीर्घ आवर्तनांते (मालिनी) |
३४ |
अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत |
स्मरत
स्तवनरूपे जो जटाशंकराला स्वच्छ मन
करुनी जो भजे शंभु त्याला समजति
शिवलोकी रुद्रतुल्य, इथेही सधन, सपुत,
दीर्घायू सुकीर्तीत होई (मालिनी) |
३५ |
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः |
महेशापरी
देव, महिम्नापरी नसे स्तुती शिवासम नसे
मंत्र, नचतत्त्व गुरूपरी (अनुष्टुप्) |
३६ |
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः |
दीक्षा,
दान, तप, तीर्थ, ज्ञान, याग करूनही महिम्नपाठे
जे लाभे, ते न सोळा कळी मिळे (अनुष्टुप्) |
३७ |
कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः |
कुसुमदशन
राजा थोर गंधर्वराज शशि शिखरि
धरी त्या, दास तो ईश्वराचा गतमहिम
जहाला, ईश्वरी कोप होता गुणकथन
शिवाचे तोच निर्मून गेला] (मालिनी) |
३८ |
सुरगुरुमभिपूज्य स्वर्गमोक्षैकहेतुं |
सुरगुरूमुनिपूज्य
स्वर्ग मोक्षास मार्ग पठण करि
स्वभावे हात जोडून रोज कुसुमदशन
स्तोत्र किन्नरां गानयोग्य वसत
शिवसमीपे, तो सदा दीर्घकाळ (मालिनी) |
३९ |
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् |
समाप्त
होतसे स्तोत्र गंधर्वरचिले असे अनुपम
मनोहारी पवित्र ईश वर्णन (अनुष्टुप्) |
४० |
इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः |
असो
ही वाङ्मयी पूजा शंकराचरणी रुजू |
४१ |
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर |
तुझे तत्त्व
न जाणे मी, कसा तू असशी शिवा जसा तू असशी
देवा, तशा तुज मी वंदितो (अनुष्टुप्) |
४२ |
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः |
एकवार
द्विवारं वा, त्रिवार म्हणता नर सर्वपाप
हरूनीया, शिवलोकी सुखे वसे (अनुष्टुप्) |
४३ |
श्री पुष्पदन्तमुखपङ्कजनिर्गतेन |
श्री पुष्पदन्तरचिता स्तुति ही शिवाची |
४४ |
॥ इति श्री पुष्पदन्तविरचितं |
॥ पुष्पदंत
विरचित शिवमहिम्न
स्तोत्र समाप्त ॥ |
1 टिप्पणी:
फारच उपयुक्त
चपखल अर्थ रूपांतर
धन्यवाद
अन्य स्तोत्रांचे अनुवाद /मराठी रूपांतर आहे का ?
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.