२०१७-०८-२०

गीतानुवाद-१००: कहता है जोकर

मूळ हिंदी गीतः नीरज, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मुकेश
चित्रपट: मेरा नाम जोकर, सालः १९७०, भूमिकाः राज कपूर, सिम्मी ग्रेवाल

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०९१५

धृ
कहता है जोकर सारा ज़माना
आधी हक़ीकत, आधा फ़साना
चश्मा उतारो, फिर देखो यारो
दुनिया नयी है, चेहरा पुराना
म्हणतो विदूषक, संसार सारा
अर्धी हकिकत, अर्धा दिखावा
चष्मा काढूनच, मित्रांनो पाहा
नव्या दुनियेचा, चेहरा जुना हा

अपने पे हँस कर जग को हँसाया
बनके तमाशा मेले में आया
हिन्दु न मुस्लिम, पूरब न पश्चिम
मज़हब है अपना हँसना-हँसाना
हसून स्वतःवर, हसवी जगाला
होऊन मजाकच, जत्रेत आला
न हिंदू-मुस्लिम, न पूर्व-पश्चिम
हसणे हसवणे धर्मच आपला

धक्के पे धक्का, रेले पे रेला
है भीड़ इतनी पर दिल अकेला
ग़म जब सताये, सीटी बजाना
पर मसखरे से दिल न लगाना
धक्क्यावर धक्के, ढकलाढकलीही
गर्दी ही इतकी, तरी मी एकाकी
दुःख झाले तर, शीळ फुंकरावी
परी विदुषकावर न प्रीत करावी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.