मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार:
नौशाद, गायक: सुमन कल्याणपूर - मुकेश
चित्रपट: साथी, साल: १९६८, भूमिका: राजेंद्रकुमार, वैजयंतीमाला
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०१२८
॥
धृ
॥
|
मेरा प्यार भी तू है
ये बहार भी तू है
तू ही नज़रों में जान-ए-तमन्ना
तू ही नज़ारों में
|
माझे प्रेमही तू आहेस
मज बहारही तू आहेस
तूच नजरेतही आहेस सखे ग
तूच दृश्यांतूनही
|
॥
१
॥
|
तू ही तो मेरा नील गगन है
प्यार से रोशन आँख उठाये
और घटा के रूप में तू है
काँधे पे मेरे सर को झुकाये
मुझ पे लटें बिखराये
|
तूच तर माझे नील गगन आहेस
प्रेमात उजळल्या डोळ्यांनी पाहत
आणि रातीच्या रूपात तू आहेस
खांद्यावर माझ्या डोके ठेवून
बटा माझ्यावर विखरून
|
॥
२
॥
|
मंज़िल मेरे दिल की वही है
साया जहा दिलदार है तेरा
परबत परबत तेरी बाहें
गुलशन गुलशन प्यार है तेरा
महके है आँचल मेरा
|
माझ्या मनचे ईप्सित तेच आहे
जिथे उदार तुझी छाया असे
पर्वत पर्वत तुझेच हात आणि
उपवन उपवन प्रेम तुझेची
गंधित वस्त्रही माझे
|
॥
३
॥
|
जागी नज़र का ख्वाब है जैसे
देख मिलन का दिन ये सुहाना
आँख तो तेरे जलवों में गुम है
देखू तुझे या देखू जमाना
बेखुद है दीवाना
|
जाग्या नजरेतले स्वप्न जणू
पाहा भेटीचा सुवर्ण दिस हा
डोळे तर तुझ्या ऐटीत मश्गुल
पाहू तुला की पाहू जगा ह्या
खुळावलो मी वेडा
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.