२०१७-०६-२६

गीतानुवाद-०९६: वन्दे मातरम्

धृ
वन्दे मातरम्
बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)
१८७५१११७
आई तुला प्रणाम
नरेंद्र गोळे
२००६०८०९

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्
सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू
हरीतशस्यावृत्त तू
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते
सुहासिनी, सुमधूर भाषिणी
सुखदा, वरदायिनी, आई

कोटि-कोटि-कण्ठ कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले
अबला केन मा एत बले
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम्
वन्दे मातरम्
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू
अबला कशी? महाशक्ती तू
अतुलबलधारिणी, प्रणितो तुज तारिणी
शत्रुदलसंहारिणी, आई
आई तुला प्रणाम

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति
हृदये तुमि मा भक्ति
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे
मातरम् वन्दे मातरम्
तू विद्या, तू धर्म
तू हृदय, तू मर्म
तूच प्राण अन् कुडीही
तूच मम बाहूशक्ती
तूची अंतरीची भक्ती
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी
आई तुला प्रणाम

त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम्
वन्दे मातरम्
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम्
तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी
कमला, कमलदल विहारिणी
वाणी, विद्यादायिनी
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई
आई तुला प्रणाम
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते
तूच घडवी, पोषी तू, आई

'आनंदमठ' लिहिण्यापूर्वी पाच वर्षे, कार्तिक शु. ९, १७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकीमचंद्र चटर्जींनी लिहिलेले हे गीत जणू 'आनंदमठ' कादंबरीसाठीच लिहिले असावे इतके चपखल बसले आहे.

संदर्भः "आनंदमठ - आक्षेप आणि खंडन", लेखक - मिलिंद प्रभाकर सबनीस, प्रकाशक - जन्मदा प्रतिष्ठान, प्रकाशन - २६ जानेवारी २००६.




२०१७-०६-२५

गीतानुवाद-०९५: तू जहाँ जहाँ चलेगा

मूळ हिंदी गीतकार: राजा मेहंदी अली खान, संगीतः मदनमोहन, गायीकाः लता
चित्रपटः मेरा साया, सालः १९६६, भूमिकाः सुनील दत्त, साधना
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०५३१

धृ
तू जहाँ जहाँ चलेगा
मेरा साया, साथ होगा
तू जिथे जिथे विहरशील
माझी छाया साथ देईल
कभी मुझको याद करके
जो बहेंगे तेरे आँसू
तो वहीं पे रोक लेंगे
उन्हें आके मेरे आँसू
तू जिधर का रुख करेगा
मेरा साया, साथ होगा
कधी माझ्या आठवणीने
जर ढळतील तुझे आसू
तिथे येऊन रोखतील ते 
पुढे होऊन माझे आसू
तू दिशेने ज्याही जाशील
माझी छाया साथ देईल

तू अगर उदास होगा
तो उदास हूँगी मैं भी
नज़र आऊँ या ना आऊँ
तेरे पास हूँगी मैं भी
तू कहीं भी जा रहेगा
मेरा साया, साथ होगा
तू उदास होशी कधी जर
तर उदास मीही होईन
मी दिसो तुला, दिसो ना
तरी जवळी तुझ्याच राहीन
तू कुठेही जात असशील
माझी छाया साथ देईल


मैं अगर बिछड़ भी जाऊँ
कभी मेरा ग़म न करना
मेरा प्यार याद करके
कभी आँख नम न करना
तू जो मुड़के देख लेगा
मेरा साया, साथ होगा
मी दुरावले कधी जर
माझे दुःख करू नको तू
माझे प्रेम आठवूनी
नको डोळे ओले करू तू
तू जर पाहसी वळूनी
माझी छाया साथ देईल


मेरा ग़म रहा है शामिल
तेरे दुख में, तेरे ग़म में
मेरे प्यार ने दिया है
तेरा साथ हर जनम में
तू कोई जनम भी लेगा
मेरा साया साथ होगा
माझे दुःख नेहमी सामिल 
तुझ्या दुःखी, तुझ्या शोकी
माझे प्रेम येईल सोबत 
हर जन्मी साथ होऊन
कुठलाही जन्म घे तू
माझी छाया साथ देईल


२०१७-०६-११

गीतानुवाद-०९४: कभी आर, कभी पार

मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर, गायक : शमशाद बेगम
चित्रपट: आर पार, साल: १९५४, भूमिका: गुरूदत्त, शामा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०१०१


धृ
कभी आर, कभी पार, लागा तीर-ए-नज़र
सैय्या घायल किया रे, तू ने मोरा जिगर
कधी आर कधी पार, करून नजरेचा वार
प्रिया घायळ करसी, किती माझे जिव्हार
कितना संभाला बैरी, दो नैनों में खो गया
देखती रह गयी मैं तो, जिया तेरा हो गया
दर्द मिला ये जीवन भर का,
मारा ऐसा तीर नज़र का
लूटा चैन करार

किती सांभाळले मन, डोळ्यांतच गुंतले
पाहतच राहिले मी तर, मन तुझे झाले रे
दुःख दिले तू जीवनभरचे
केले वार असे नजरेचे
हरले सौख्यच पार

पहले मिलन में ये तो दुनियाँ की रीत है
बात में गुस्सा लेकिन दिल ही दिल में प्रीत है
मन ही मन में लड्डू फूटे,
नैनों में फुलझडीयाँ छूटे
होठों पर तकरार

पहिल्या भेटीची ही तर दुनियेची रीत आहे
बोलतांना राग तरी हृदयात प्रीत आहे
मनोमनी का लाडू फुटती
नेत्रांतुन का उजळत ज्योती
ओठांवर तक्रार
मर्ज़ी तिहारी चाहे मन में बसाओ जी
प्यार से देखो चाहे, आँखों से गिराओ जी
दिल से दिल टकरा गये अब तो,
चोट जिगर पर खा गये अब तो
अब तो हो गया प्यार

मर्जी तुझी हवे तर मनामधे ठेव तू
प्रेमाने पाहा, वा नजरेतून उतरव तू
हृदयास हृदय भिडलेले आहे
घाव मनावर बसला आहे
हे तर जडले प्रेम