मूळ हिंदी गीत: साहीर, संगीत: रवी, गायक: महेंद्र कपूर,
चित्रपट: हमराज, साल: १९६७, भूमिका: राजकुमार, सुनिल दत्त, मुमताज, विम्मी
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५०५२८
न मुँह छुपा के जियो
|
मुख न लपवून जगा
|
|
॥
धृ
॥
|
न मुँह छुपा के जियो, और न सर झुका के जियो
गमों का दौर भी आये, तो मुस्कुरा के जियो
|
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या
की दु:ख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा
|
॥
१
॥
|
घटा मे छुप के, सितारे फना नहीं होते
अंधेरी रात के दिल में, दिये जला के जियो
|
की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती
अंधेर्या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा
|
॥
२
॥
|
ये जिंदगी किसी मंझिल पे, रुक नहीं सकती
हर एक मकाम के, आगे कदम बढा के जियो
|
कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते
दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला
|
॥
३
॥
|
न जाने कौनसा पल, मौत की अमानत हो
हरेक पल की खुशी को, गले लगा के जियो
|
न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल
क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.