२०२४-१०-२१

गीतानुवाद-२९४: लेके पहला-पहला प्यार

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः ओ. पी. नय्यर,
गायकः शमशाद बेगम, आशा भोसले, महंमद रफी
चित्रपटः सी.आय.डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१०२१


धृ

, लेके पहला-पहला प्यार
भर के आँखों में ख़ुमार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

घेऊन पहिली पहिली प्रीत
डोळ्यांतून झरत नवनीत
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

उसकी दीवानी, हाय, कहूँ कैसे हो गई
जादूगर चला गया, मैं तो यहाँ खो गई

खुळी कशी झाले मी, कसे सांगू बाई
जादूगार निघून गेला, शोधत मी राही

नैना जैसे हुए चार
गया दिल का क़रार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

डोळे भिडता डोळ्यांनाच
सुटला धीरच माझा पार
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

तुम ने तो देखा होगा उसको, सितारों?
आओ, ज़रा मेरे संग मिल के पुकारो

तुम्ही तर बघितले असेल तार्‍यांनो त्याला?
या जरा बोलावू माझ्यासोबत पुकारा

डोलूँ होके बेक़रार, ढूँढे तुझको मेरा प्यार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

झुरते होऊन मी बेजार, शोधे तुजला वारंवार
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

जब से लगाया तेरे प्यार का काजल
काली-काली बिरह की रतियाँ हैं बेकल

डोळ्यां त अंजन तुझ्या प्रीतीचे लावून
विरहाच्या राती या करतात विकल

आजा, मन के सिंगार, करे बिंदिया पुकार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

ये रे मनिचा तू श्रुंगार, बिंदी तुझा करे पुकार
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

मुखड़े पे डाले हुए ज़ुल्फ़ों की बदली
चली बलखाती कहाँ? रुक जा, , पगली

चेहर्‍यावर मेघ जणू, आणून हे कुंतल
जाशी थिरकत कुठे, थांब थांब ए खुळी

नैनों वाली तेरे द्वार, ले के सपने हज़ार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

नेत्रपल्लवीत तू हुशार, घेऊन स्वप्ने हजार
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

चाहे कोई चमके जी, चाहे कोई बरसे
बचना है मुश्किल पिया जादूगर से

झळका कितीही, बरसा कितीही
वाचणेच मुष्कील, जादुगाराहाती

१०

देगा ऐसा मंतर मार
आख़िर होगी तेरी हार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

टाकील मंत्र असा महान
शेवटी तुझीच होईल हार
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

११

सुन-सुन बातें तेरी गोरी मुस्काई रे
आई-आई देखो-देखो, आई, हँसी आई रे

ऐकू ऐकू गोष्टी तुझ्या, स्मितही स्फुरले रे
पाहा पाहा पाहा आले, हसू छान आले रे

१२

खेली होंठों पे बहार
निकला ग़ुस्से से भी प्यार
जादूनगरी से आया है कोई जादूगर

खेळे ओठांवरती बहार
प्रीती रागातून हो पार
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.