२०२४-०७-१८

गीतानुवाद-२९१: आये बहार बनके

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मोहम्मद रफी
चित्रपटः राजहठ, सालः १९५६, भूमिकाः प्रदीपकुमार, मधुबाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७१८


धृ

आये, बहार बन के
लुभाकर चले गए
क्या राज़ था जो दिल में
छुपाकर चले गए

आली, बहार झाली
मोहवूनची गेली
होते रहस्य काय जे
लपवून ती गेली

इतना मुझे बताओ मेरे
दिल की धडकनों
वो कौन थे जो
ख्वाब दिखा कर चले गए

इतके मला सांगा माझे
हृदयीचे स्पंद हो
होती ती कोण
स्वप्न दाखवून जी गेली

कहने को वो हसीन थे
आँखें थीं बेवफा
दामन मेरी नज़र से
बचाकर चले गए

म्हटले तर सुंदर होती ती
फसवे होते डोळे
नजरेतून माझ्या वाचवून
स्वतःस ती गेली