वृत्तः इंद्रवज्रा (अक्षरे-११)
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०२२१
१ |
यं वैदिका मन्त्रदृशः
पुराणा |
इंद्रा यमा मातरिश्वापरी जे |
२ |
शैवा यमीशं शिव
इत्यवोचन् |
ज्याला शिवा
बोलत शैव लोक |
३ |
शास्तेति केचित् प्रकृतिः
कुमारः |
शास्ता कुणी प्रकृति
वा कुमार |
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
अर्थ
प्राचीन काळचे मंत्रदृष्टी असलेले ऋषी ज्याला इंद्र, यम, मातरिश्वन् आदी वैदिक देवता (वैदिका) म्हणून संबोधतात, ज्या एका अवर्णनीय अद्वितीयाला वेदांती लोक ब्रह्मा म्हणून उल्लेखतात, शैव ज्याची शंकर म्हणून आणि वैष्णव ज्याची विष्णू म्हणून स्तुती करतात, बौद्ध आणि जैन ज्याला बुद्ध आणि अर्हन्न म्हणतात, त्याचप्रमाणे शीख ज्याला सत् श्री अकाल म्हणून संबोधतात, ज्या जगत्रात्याला कोणी शास्ता, कोणी प्रकृती, कोणी कुमारस्वामी, कोणी माता, कोणी पिता मानून भक्तिपूर्वक प्रार्थना करतात, तो अद्वितीय ईश्वर एकच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.