२०१९-०६-२८

गीतानुवाद-१२६: ठहरिये होश में आ लूँ


मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: खय्याम, गायक: सुमन कल्याणपूर - रफी
चित्रपट: मोहब्बत इस को कहते हैं, सालः १९६५, भूमिकाः शशी कपूर, नंदा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०२११


धृ
ठहरिये होश में आ लूँ, तो चले जाईएगा
आप को दिल में बिठा लूँ, तो चले जाईएगा

थांब शुद्धित येऊ दे, मग हवे तर जा ना
ठेवू दे अंतरी तुजला, मग हवे तर जा ना
कब तलक़ रहिएगा यूँ दूर की चाहत बन के
दिल में आ जाईए, इकरार-ए-मोहब्बत बन के
अपनी तकदीर बना लूँ, तो चले जाईएगा

कुठवर राहशील अशी दूरची आवड होऊन
ये माझ्या अंतरी, प्रीतीचा स्वीकार बनून
दैव आपले गं घडवू या, मग हवे तर जा ना
मुझ को इकरार-ए-मोहब्बत से हया आती है
बात कहते हुए गर्दन मेरी झुक जाती है
देखिये सर को झुका लूँ, तो चले जाईएगा

लाज प्रीतीच्या कबूलीची मला वाटत आहे
सांगतांनाही झुके मान, मी लाजत आहे
झुकवू दे मान जराशी, मग हवे तर जा ना
ऐसी क्या शर्म जरा, पास तो आने दीजिये
रुख़ से बिखरी हुई जुल्फे तो हटाने दीजिये
प्यास आँखों की बुझा लूँ, तो चले जाईएगा
एवढी काय लाज, जरा जवळ तर येऊ दे ना
रूपावर विखुरलेल्या बटा ह्या, सरकवू दे ना
तृप्त नेत्रांना करू दे, मग हवे तर जा ना