२०१९-०४-१५

गीतानुवाद-१२४: वो शाम कुछ अजीब थी


मूळ हिंदी गीतः गुलजार, संगीतः हेमंतकुमार, गायकः किशोर कुमार
चित्रपटः खामोशी, सालः १९६९, भूमिकाः राजेश खन्ना, वहिदा रहमान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०५०८


धृ
वो शाम कुछ अजीब थी
ये शाम भी अजीब है
वो कल भी पास पास थी
वो आज भी करीब है

ती सांज औरशी होती
ही सांजही औरच आहे
ती काल आसपास होती
ती आजही तशीच आहे
झुकी हुई निगाह में कहीं मेरा खयाल था
दबी दबी हँसी में इक हसीन सा गुलाब था
मै सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यों लगा मुझे के मुस्कुरा रही है वो

भुईत रोखल्या नजरेत कुठे माझा विचार असेल
अस्फुट स्मितात सुंदरसा देखणा गुलाब असेल
मला वाटले ती नाव माझेच गुणगुणत असेल
न कळे का वाटले मला स्मित ती करत असेल
मेरा खयाल है अभी झुकी हुई निगाह में
खिली हुई हँसी भी है दबी हुई सी चाह में
मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो
यही खयाल है मुझे के साथ आ रही है वो

मला वाटते आहे अवनत अशा, नयनांत त्या
सूप्त माझ्या आवडीत उमललेले हसूही आहे
माहीत आहे ती नाव माझेच गुणगुणत असेल
वाटे मला असे की ती संगत माझी करत असेल



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.