२०१८-०२-१३

गीतानुवाद-१०४: गीत गाया पत्थरोंने


मूळ हिंदी गीतः हसरतसंगीतः रामलालगायकः किशोरी आमोणकर, आशा, महेंद्र कपूर
चित्रपटः गीत गाया पत्थरों नेसालः १९६४भूमिकाः राजश्रीजितेंद्र
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०१०५

धृ
सासों के तार पर, धडकन के ताल पर
दिल के पुकार का, रंगभरे प्यार का
गीत गाया पत्थरोंने
 गीत गाया पत्थरोंने
श्वास संगीतावर, हृदय स्पंदनांवर
साद अंतरीचे, रंगभर्‍या प्रीतीचे
गाणे म्हटले पाषाणांनी 
गाणे म्हटले पाषाणांनी

इन्सा की चाहतभरी कल्पनाने
दिल भी हैं, घर भी हैं 
 पत्त्थरमें वो ला जवानी
एक एक सुरत हैं शक्ले मुहब्बत
हाथों ने दी जिंदगानी
प्यार के सुरोंपर, अपनीही धून में
दिल के पुकार का, रंगभरे प्यार का
गीत गाया पत्थरोंने
गीत गाया पत्थरोंने
मनुजाच्या ईप्सितपुर्‍या कल्पनेतून
मनही आहे, घरही आहे
दगडात भरले हे यौवन
हर एक मूर्तीत उमटलेली प्रीती
हातांनी घडले हे जीवन
प्रीतीच्या सुरांवर, आपल्याच धुंदीत
साद अंतरीचे, रंगभर्‍या प्रीतीचे
गाणे म्हटले पाषाणांनी
गाणे म्हटले पाषाणांनी

हर एक पत्थरपें बरसेंगी उलफत
सालों ही सदियों ही हरदम रहेंगे ये मिलते
इनमें नहीं हैं इन्सा का भेदभाव
तुकडे हैं ये एक दिल के
शांती के रागपर, एकता के तानपर
दिल के पुकार का, रंगभरे प्यार का
गीत गाया पत्थरोंने
गीत गाया पत्थरोंने
हर एक दगडावर उमटे कहाणी
वर्षेही, शतकेही, भेटतच राहतील नेहमी
ह्यांच्यात नाही मनुजाचा भेदभाव
तुकडे हे एका दिलाचे
शांतीच्या रागावर, एकतासुरावर
साद अंतरीचे, रंगभर्‍या प्रीतीचे
गाणे म्हटले पाषाणांनी
गाणे म्हटले पाषाणांनी

पथरीले होटोंसे निकला है नगमा
अलबेला दर्दिला मस्तीभरी जिंदगीका
चमके मोहोब्बत के पहलू हजारो
पैगाम है बेखुदीका
मौसम के ताल पर मस्तानी धुन्द में
दिल के पुकार का, रंगभरे प्यार का
गीत गाया पत्थरोंने
गीत गाया पत्थरोंने
दगडी ह्या ओठांतून आलेले गीत हे
स्वानंदी, संवेदी, मस्तीभर्‍या जीवनाचे
झगमगती प्रीतीचे पैलू हजारो
संदेश बेभानतेचा
तालावर ऋतूच्या, धुंदीत मस्तीच्या
साद अंतरीचे, रंगभर्‍या प्रीतीचे
गाणे म्हटले पाषाणांनी
गाणे म्हटले पाषाणांनी

जबतक है कायम ये धरती ये अंबर
यारों के, आहों के, गुंजा करेंगे तराने
अपनीही सिनों की ये बेकरारी 
देखा करेंगे जमाने
हृदय के बीन पर जीवन के तार पर
दिल के पुकार का, रंगभरे प्यार का
गीत गाया पत्थरोंने
गीत गाया पत्थरोंने
जोवर आहे कायम ही धरती हे आकाश
आप्तांच्या, सादांची, गुंजत राहतील गाणी
आपल्याच अंतरीची ही बेगुमानी
जग हे पाहील उद्याचे
हृदयाच्या वंशीवर, जीवनाच्या संगतीत
साद अंतरीचे, रंगभर्‍या प्रीतीचे
गाणे म्हटले पाषाणांनी
गाणे म्हटले पाषाणांनी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.