मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः वसंत देसाई, गायकः लता, रफी
चित्रपटः गूंज उठी शहनाई, सालः १९५९, भूमिकाः राजेंद्रकुमार, अमिता, अनिता
गुहा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०६०९
॥
धृ
॥
|
जीवन में पिया तेरा साथ रहे
हाथों में तेरे मेरा हाथ रहे
जीवन में पिया तेरा साथ रहे
|
जीवनभर प्रिया तुझी साथ असो
हातात तुझ्या माझा हात असो
जीवनभर प्रिया तुझी साथ असो
|
॥
१
॥
|
शृंगार भरा पिया प्यार तेरा
झंकार करे है मेरे कँगना में
लगी जब से लगन मेरे मन में सजन
शहनाई बजे है मेरे अँगना में
सरगम की तरह बरसात रहे
हाथों में तेरे मेरा हाथ रहे
|
श्रुंगारभरे सख्या प्रेम तुझे
झंकार कंकणी मम ते भरते
मनी आस तुझी वसल्यापासून
अंगणात भरत सुर शहनाई
सरगम परि रिमझिम झरत असो
हातात तुझ्या माझा हात असो
|
॥
२
॥
|
जब तक सूरज चन्दा चमके
गंगा जमुना में बहे पानी
रहे तब तक प्रीत अमर अपनी
है ये जनम जनम की दीवानी
ओ रानी याद मिलन
ओ जी हो ओ ओ ओ
ओ रानी याद मिलन की ये रात रहे
हाथों में तेरे मेरा हाथ रहे
|
जोवर सूर्य चंद्रही झळके
वाहत गंगा यमुनेत जले
तोवर राहो अमर प्रीती आपली
मी जन्मोजन्मी प्रीत-खुळी
राणी आठवणीत ही
ओ जी हो रात असो
राणी आठवणीत ही रात असो
हातात तुझ्या माझा हात असो
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.