२०१६-१२-३१

गीतानुवाद-०८८: हजारो ख्वाहिशे ऐसी

मूळ उर्दू गीतकार: मिर्ज़ा ग़ालिब
गायक: जगजित सिंग / अबिदा परवीन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६१२३१



धृ
हज़ारों ख्वाहिशें ऐसी की
हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान
लेकिन फिर भी कम निकले

हजारो ईप्सिते ऐसी,
उधळावे प्राण ज्यांवरती
उसळल्या कितीक आकांक्षा,
परी त्याही कमी ठरती
मोहब्बत में नहीं हैं फ़र्क़
जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं
जिस काफ़िर पे दम निकले

उरत नाही प्रीतीत मुळी,
भेद जगण्या नी मरण्यातही
तिला पाहून जगतो मी,
वाहिले प्राण जिच्यावरती
डरे क्यों मेरा क़ातिल,
 क्या रहेगा उसकी गर्दन पर
वो खून, जो चश्म-ए-तर से
उम्र भर यूँ दम-ब-दम निकले

कशाला भय हवे मारेकर्या,
मुंडी धडावर राहिलही का?
रक्त जे ओघळे आयुष्यभर,
श्वासागणिक, तयाकरता
निकलना खुल्द से आदम का
सुनते आये हैं लेकिन
बहुत बेआबरू होकर
तेरे कुचे से हम निकले

ऐकले खूप स्वर्गातून की,
निष्कासीत मनू झाला
अनादर त्याहूनही माझा,
तुझ्या दारी असे झाला
हुई जिनसे तवक्को
खस्तगी की दाद पाने की
वो हमसे भी ज्यादा
ख़स्त-ए-तेघ-ए-सितम निकले

अपेक्षा ज्यांकडूनी मला,
राहिली दाद मिळण्याची
माझ्याहूनही अधिक
घायाळ ठरले जुल्मी घावांनी
खुदा के वास्ते परदा ना
काबे से उठा ज़ालिम
कहीं ऐसा ना हो याँ भी
वही काफ़िर सनम निकले

ईश्वरासाठी खला, उचलू नको,
काब्यावरील पडदा
न जाणो गूढ आकळता,
तिथे प्रियतमच असे उरला
कहाँ मयखाने का दरवाज़ा
'ग़ालिब' और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं
कल वो जाता था के हम निकले

कुठे मदिरालयाचे द्वार अन्
कुठे गुरूजी, अरे गालिब
तिथे ते काल गेलेले,
आज मी, सत्य हे एवढे माहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.