२०२४-११-१७

गीतानुवाद-२९५: अगर सुन ले तो एक नग़्मा

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः चित्रगुप्त, गायकः किशोरकुमार
चित्रपटः एक राझ, सालः १९६३, भूमिकाः किशोरकुमार, जमुना 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१११७


धृ

अगर सुन ले तो एक नग़्मा
हुज़ूर-ए-यार लाया हूँ
वो कली चटकी कि दिल टूटा
पर एक झंकार लाया हूँ

ऐकशील तर मी हे एक गीत
प्रिये तुजसाठी आणलेले
ती कळी खुलली तर मन चळले
तरी हुंकार आणलेला

मुझे मालूम है इतना कि
मैं क्या, मेरी कीमत क्या
जो सबकुछ था जो कुछ भी नहीं
एक ऐसा प्यार लाया हूँ

मला ठाऊक आहे इतके
कसा मी, माझी किंमत काय
असे सर्वस्व, नसे शिल्लक
असे मी प्रेम आणलेले

अचानक आ गिरी बिजली
तो फिर सूरत यही निकली
उजड़ गया दिल तो अब ज़ख़्मों
का एक गुलज़ार लाया हूँ

अचानक वीज पडली अन्‌
उपाय एकच हा उरलेला
विरसले मन तरी स्वप्नांचा
हा गुच्छच मी आणलेला

अजब हूँ मैं भी दीवाना
अजब है मेरा नज़राना
कि उनके लिए मैं अपनी वफ़ा
का टूटा हार लाया हूँ

अजब आहे असा मी खुळा
अजब माझी ही भेट तुला
प्रियेस्तव मी हा प्रीतीचा
हार तुटकाच आणलेला