२०२२-०१-२३

गीतानुवाद-२३७: बहारों फूल बरसाओ

मूळ हिंदी गीतः हसरत, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः रफी
चित्रपाः सुरज, सालः १९६६, भूमिकाः राजेंद्रकुमार, वैजयंतीमाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९१३

धृ

बहारों फूल बरसाओ
मेरा महबूब आया है
हवाओं रागिनी गाओ
मेरा महबूब आया है

बहारी तू फुले वर्षव
प्रिया माझी आलेली आहे
हवांनो नादवा संगीत
प्रिया माझी आलेली आहे

ओ लाली फूल की मेंहँदी
लगा इन गोरे हाथों में
उतर आ ऐ घटा काजल
लगा इन प्यारी आँखों में
सितारों माँग भर जाओ

फुलांच्या लालीम्या रंगव
मेहेंदी गोर्‍या हातांवर
काजळा रात्रीतून येऊन
सजव हे आवडते डोळे
तार्‍यांनो द्या प्रभा तुमची

नज़ारों हर तरफ़ अब तान
दो इक नूर की चादर
बडा शर्मीला दिलबर है
चला जाये न शरमा कर
ज़रा तुम दिल को बहलाओ

देखाव्यांनो चहुबाजूंस
चादर दीप्तीची पसरा
लाजरी ही प्रिया आहे
न जावो लाजूनी परतून
जरा रमवा प्रियेचे मन

सजाई है जवाँ कलियों ने
अब ये सेज उल्फ़त की
इन्हें मालूम था आएगी
इक दिन ऋतु मुहब्बत की
फ़िज़ाओं रंग बिखराओ

सजवलेली तरूण कलिकांनी
आहे ही शय्या प्रेमाची
माहित होते यांना एक दिस
ऋतू प्रेमाचा येईल की
बहारींनो रंग उधळा