मराठीत अनुवाद करणे हा माझा छंद आहे. अनुवादात, मूळ भाषेतील लिखाणात वर्णिलेल्या वास्तवाचे साक्षात अवतरण करण्याची कला मुळातच रंजक आहे. इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि उर्दू भाषांतून मी मराठीत भाषांतरे केलेली आहेत. मूळ साहित्य रचनेहूनही कित्येकदा अनुवादास अधिक कौशल्य लागत असते. म्हणूनच ही एक अभिजात कला आहे. इतर भाषांतील रस-रंजनाचा निर्झर मराठीत आणण्याचे हे काम आहे. रसिक वाचकास रुचेल तोच अनुवाद, चांगला उतरला आहे असे मानता येईल!