२०१५-०१-०८

गीतानुवाद-०२८: बहार बनके वो मुस्कुराए

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायीकाः लता
चित्रपटः अपने हुए पराये, सालः १९६३, भूमिकाः माला सिन्हा, मनोजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४०१०८


॥धृ॥
बहार बनके वो मुस्कुराए हमारे गुलशन में
बाद-ए-सबा तू न आए तो क्या,
काली घटा तू न छाए तो क्या
बहार होऊन ते हासले उपवनी आज आमच्या
वार्‍या पहाटेच्या ये वा न ये
रात्री अंधारी तू हो वा न हो
॥१॥
मेरे दिल की राहों पे मेरे संग-संग आ
तुझको दिखला दूँ मैं हमदम अपना
रंगोंभरी दुनिया मेरी,
मेरा प्यार पहला
मनीच्या रस्त्यांवर तू ये संगत माझ्या
दाखवते आज तुला ग प्रियतम माझा
रंगीत माझे विश्व आणि
प्रीत माझी पहिली
॥२॥
छुपके कोई आया है जबसे दिल में
हर दिन नई हलचल है मेरी महफ़िल में
धड़कन मेरी गाने लगी
अभी गीत उनका
गुपचूप कुणी शिरलेला मनी जवपासून
रोज नवे घडते आहे माझ्या मैफलीतून
स्पंदन माझे, गाते आहे,
आज गीत त्यांचे
॥३॥
मतवाली डोलूँ मैं, खोई सपनों में
अब मेरा दिल लागे ना मेरे अपनों में
क्या मिल गया क्या खो गया,
दिल ही जाने मेरा
वेडी अशी नाचू मी, स्वप्नांतच खूष
आता हे मन लागे ना माझ्या आपल्यांतून
काय लाभले काय हरवले
मीच जाणे माझे