२०१५-०९-३०

गीतानुवाद-०६२: आ जा सनम

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः लता, मन्ना डे;
चित्रपटः चोरीचोरी, सालः १९५६, भूमिकाः राज कपूर, नर्गिस;

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०९२३,

संस्कृत अनुवादः राजेंद्र भावे, मुंबई

धृ
लता
आ जा सनम मधुर चाँदनी मे ह्म तुम
मिले तो विराने में भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमाँ-२
कहता हैं दिल और मचलता है दिल
मोरे साजन ले चल मुझे तारों के पार
लगता नहीं हैं दिल यहाँ-२
लता
ये रे प्रिया, मधुर चांदण्यात ह्या, भेटता
आपण, ह्या सुन्या संसारी ये बहार
नाचू लागेल गगन रास -२
म्हणते हे मन, अन्‌ उसळते हे मन
साजणा घेऊन चल, मला तार्‍यांच्या पार
लागे न मन ह्या जगात-२
लता
एहि रे प्रिय, मधुरचंद्रिकायाम्
नौ मिलेव निरस्तस्थले प्रमोदते मन:
[दोलायते मुदाम्बरम्] -२
आख्याति मन्मनश्चंचलायते,
नय हे मम हृदयेश्वर, मा तारांगणपारम्
[रमते न हि मे मानसम्] -२

मन्ना
भीगी भीगी रात में दिल का दामन थाम ले
खोई खोई जिंदगी हर दम तेरा नाम ले
लता
चाँद की बहकी नजर कह रही हैं प्यार कर
जिंदगी है इक सफर कौन जाने कल किधर
मन्ना
आ जा सनम मधुर चाँदनी मे ह्म तुम
मिले तो विराने में भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमाँ-२
लता
कहता हैं दिल और मचलता है दिल
मोरे साजन ले चल मुझे तारों के पार
लगता नहीं हैं दिल यहाँ-२
मन्ना
भिजल्या सर्द राती ह्या, मनाच्या पाठी जाऊ ये
सुटले, हरले, हे जीवन, श्वासागणिक तव नाव घे
लता
चंद्राची ढळती नजर, सांगते तू प्रीत कर
जीवनप्रवाही ना, कळे कुणा, उद्या कुठे
मन्ना
ये ग प्रिये, मधुर चांदण्यात ह्या, भेटता
आपण, ह्या सुन्या संसारी ये बहार
नाचू लागेल गगन रास -२
लता
म्हणते हे मन, अन्‌ उसळते हे मन
साजणा घेऊन चल, मला तार्‍यांच्या पार
लागे न मन ह्या जगात-२
मन्ना
सिक्तायां यामिन्यांss चित्तांचलम् आकर्ष मे
शून्यायुष्यं मदीयं त्वन्नाम हि नित्यं स्मरेत्
लता
[चंद्रप्रणयाक्षिणी सूचयत: प्रेम माम्
जीवनप्रवाहे जानीते क: श्व:]
मन्ना
एहि रे प्रिय, मधुरचंद्रिकायाम्
नौ मिलेव निरस्तस्थले प्रमोदते मन:
[दोलायते मुदाम्बरम्] -२
लता
आख्याति मन्मनश्चंचलायते,
नय हे मम हृदयेश्वर, मा तारांगणपारम्
[रमते न हि मे मानसम्] -२

मन्ना
दिल ये चाहे आज तो बादल बन उड जाऊँ मैं
दुल्हन जैसा आसमाँ धरती पर ले आऊँ मैं
लता
चाँद का डोला सजे धूम तारों मे मचे
झुमके दुनिया कहे प्यार मे दो दिल मिले
दोनो
आ जा सनम मधुर चाँदनी मे ह्म तुम
मिले तो विराने में भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमाँ-२
लता
कहता हैं दिल और मचलता है दिल
मोरे साजन ले चल मुझे तारों के पार
लगता नहीं हैं दिल यहाँ-२
मन्ना
वाटे मनाला आज तर, उडू मेघ होऊन काय मी
नवरीपरी काय आणू मी, नभ हे असे धरतीवरी
लता
चंद्रमा-रथ हा सजे, मेळ तार्‍य़ांतही घडे
नाचत दुनिया म्हणे, प्रेमात जुळली मने
दोघे
ये ये प्रिया, मधुर चांदण्यात ह्या, भेटता
आपण, ह्या सुन्या संसारी ये बहार
नाचू लागेल गगन रास -२
लता
म्हणते हे मन, अन्‌ उसळते हे मन
साजणा घेऊन चल मला, तार्‍यांच्या पार
लागे न मन ह्या जगात-२
मन्ना
चित्तं इच्छति अद्य मे, मेघो भूत्वाsहमुड्डये
नवपरिणीताकाशं अवनीं गृहीत्वाsयाम्यहम्
लता
शशिशिबिका भूषिता, हर्षस्तारांगणे
विश्वं कथयेन्मुदा, प्रणये मिलत: हृदौ
उभौ
एहि रे प्रिय, मधुरचंद्रिकायाम्
नौ मिलेव निरस्तस्थले प्रमोदते मन:
[दोलायते मुदाम्बरम्] -२
लता
आख्याति मन्मनश्चंचलायते,
नय हे मम हृदयेश्वर, मा तारांगणपारम्
[रमते न हि मे मानसम्] -२


आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन



१९९१ पासून दरसाल, ३० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन साजरा केला जात असतो. बायबलचे हिब्रू भाषेतून लॅटीन भाषेत भाषांतर करणारे संत जेरोम, ह्यांना आद्य भाषांतरकार म्हटले जाते. त्यांच्या स्मृतीदिनी (फिस्ट ऑफ द सेंट), म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी, हा जागतिक भाषांतर दिन साजरा केला जात असतो. भाषांतरकारांची आंतरराष्ट्रीय संघटना (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्स्लेटर्स), १९५३ साली झालेल्या तिच्या स्थापनेपासून, केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्वच देशांतील भाषांतर व्यवसायाच्या प्रगतीस सहसंवेदना व्यक्त करण्यासाठी, हा दिवस साजरा करत असते. वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात वाढते महत्त्व प्राप्त करत असणार्‍या ह्या व्यवसायास, अभिमान अभिव्यक्त करण्याची ही एक संधीच असते.

’अमृताते पैजा जिंके”’ असे जिचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे, त्या मराठी भाषेसही भाषांतरकौशल्याचा खूप संपन्न वारसा लाभलेला आहे.  श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेचा विनोबाजींनी (विनायक भावे ह्यांनी) केलेला ’गीताई” हा अनुवाद तर ह्या सार्‍या अनुवादांत शीर्षस्थ आहे. हरी नारायण आपटे ह्यांनी केलेला ’साम ऑफ लाईफ’ ह्या हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो ह्या प्रख्यात इंग्लिश कवीच्या कवितेचा मराठी अनुवाद ’जीवित महिमा' अत्यंत वाचनीय आहे.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीने हिंदी गीतांच्या संस्कृत भाषांतराची एक स्पर्धा आयोजित केलेली होती. त्यात श्री.राजेंद्र भावे ह्या मुंबईस्थित संस्कृत पंडितांनी राश्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत, “आजा सनम, मधुर चाँदनी में हम” ह्या सुमधुर गीताचा संस्कृत अनुवाद केला होता. त्यांचेच सुपूत्र आणि विख्यात गायक श्री. श्रीरंग भावे ह्यांनी तो गायिलेलाही आहे. त्याच गीताचा मराठी अनुवादही ह्यासोबतच इथे ह्याच अनुदिनीवर सादर करत आहे.

२०१५-०९-२१

गीतानुवाद-०६१: जादूगर सैंया छोड़ो मोरी बैंया

मूळ हिंदी गीतः राजिंदर क्रिशन, संगीतः हेमंत, गायीकाः लता
चित्रपटः नागिन, सालः १९५४, भूमिकाः प्रदीपकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८१००२

धृ
जादूगर सैंया, छोड़ो मेरी बैंया
हो गई आधी रात, अब घर जाने दो
जादूगर सजणा, सोड माझा हात ना
ढळली अर्धी रात्र, आता घरी जाऊ दे



जाने दे ओ रसिया, मेरे मन बसिया
गाँव मेरा बड़ी दूर है
(तेरी नगरिया रुक न सकूँ मैं
प्यार मेरा मजबूर है) \-
ज़ंजीर पड़ी मेरे हाथ
अब घर जाने दो
जाऊ दे रे रसिका, माझ्या प्रिय सखया
गाव माझे खूप दूर आहे
(तुझ्या नगरी या थांबू शके न मी
प्रेम माझे असहाय्य आहे ) \-
निर्बंधित माझे हात
आता घरी जाऊ दे



झुकी-झुकी अँखियाँ देखेंगी सारी सखियाँ
देंगी ताना तेरे नाम का
(ऐसे में मत रोक बेदर्दी
ले ले वचन कल शाम का) \-
कल होंगे फिर हम साथ
अब घर जाने दो
झुकते नयन हे पाहतील सखया
देतील उखाणा तुझ्या नावचा
(अशातच न तू रोख निर्दया
घे हा वायदा उद्या सांजचा)  \-
आपण भेटूच उद्याला पुन्हा
आता घरी जाऊ दे