अक्र
|
Optical Fiber
|
प्रकाशतंतू |
|
|
|
१
|
An optical fiber is a flexible,
transparent fiber made of a pure glass (silica) not much wider than a human
hair.
|
प्रकाशतंतू
हा शुद्ध काचेचा (वालुका-स्फटिकाचा*) बनवलेला लवचिक, पारदर्शक, मनुष्याच्या केसाहून फारसा
जाड नसलेल्या आकाराचा धागा असतो. |
२
|
It functions as a waveguide, or light
pipe, to transmit light between the two ends of the fiber.
|
तो
लहर-मार्गदर्शक किंवा प्रकाश-नलिका म्हणून, धाग्याच्या दोन टोकांदरम्यान प्रकाश पारेषित करण्याचे
कार्य करत असतो. |
३
|
The field of applied science and
engineering concerned with the design and application of optical fibers is
known as fiber optics.
|
प्रकाशतंतूंच्या
अभिकल्पन आणि उपायोजनाशी संबंधित उपायोजित विज्ञान आणि अभियांत्रिकी संबंधित
क्षेत्रास प्रकाशतंतूशास्त्र म्हणून ओळखले जाते. |
४
|
Optical fibers are widely used in
fiber-optic communications, which permits transmission over longer distances
and at higher bandwidths (data rates) than other forms of communication.
|
प्रकाशतंतूंचा
उपयोग प्रकाशारोही संदेशवहनात विस्तृत प्रमाणात केला जातो, त्यांचेमुळे इतर
संदेशवहन स्वरूपांचे मानाने दीर्घ पल्ल्याचे अंतर आणि अधिकतर कंप्रता-पल्ला-रुंदी (विदा दर)
प्राप्त होऊ शकते. |
५
|
Fibers are used instead of metal wires
because signals travel along them with less loss and are also immune to
electromagnetic interference.
|
धात्विक
तारांऐवजी प्रकाशतंतूं वापरले जातात कारण त्यांचेवर संकेत थोडाच र्हास होऊन
प्रवास करू शकतात आणि विद्युत्-चुंबकीय व्यवधानांपासून अबाधित राहतात. |
६
|
Fibers are also used for illumination
and are wrapped in bundles so they can be used to carry images, thus allowing
viewing in tight spaces.
|
प्रकाशतंतू
उजेडाकरताही वापरले जातात आणि मोळ्यांमध्ये बंदिस्त केले जातात जेणेकरून ते
दृश्ये वाहून नेऊ शकतात आणि कमी जागेत त्यांचे दर्शन होऊ शकते. |
७
|
Specially designed fibers are used for
a variety of other applications, including sensors and fiber lasers.
LASER – Light
Amplification by Simulated Emmission of Radiation.
|
विशेषकरून अभिकल्पित प्रकाशतंतू, विविध इतर उपायोजनांकरताही वापरले जातात,
ज्यात संवेदन आणि लेझर यांचा समावेश होत असतो. लेझर - उत्तेजित-प्रारण-उत्सर्जनाद्वारे केलेले प्रकाश-वर्धन. |
* म्हणजेच सिलिकॉन
प्राणिलाचा ऊर्फ सिलिकाचा