२०१५-०५-१२

गीतानुवाद-०३१: रेशमी सलवार

मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतकार: ओ.पी.नय्यर, गायकः आशा-शमशाद बेगम
चित्रपटः नया दौर, सालः १९५७, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०४२६

धृ
आशाः
रेशमी सलवार कुडता जाली का
रूप सहा नही जाए नखरेवाली का
शमशादः
जा रे पिछा छोड मुझ मतवाली का
काहे ढुंडे रास्ता कोतवाली का
आशाः
रेशमी सलवार कुडता जाळीचा
रूप सह्य न, नखराही कमालीचा
शमशादः
जा रे पिच्छा सोड मज मतवालीचा
का रे रस्ता शोधसी तू चौकीचा



आशाः
जब जब तुझ को देखूँ
मेरे दिल में छुटें फुलझडीयाँ
करूँगा तेरा पिछा
चाहे लग जाए हथकडियाँ
क्या है कोतवालीका
आशाः
पाहे जेव्हा तुला मी
फुलझड्या अंतरी झडती
मी करेन पिच्छा, पडल्या
जरी हातकड्याही हाती
पाड काय चौकीचा



शमशादः
मैं हूँ इज्जतवाली
मुझे समझ न ऐसी वैसी
बडे बडों की मैनें
कर दी है ऐसी तैसी
तू है किस थाली का
शमशादः
आहे घरंदाज मी नारी
मला समज न असली तसली
बड्याबड्यांची केली,
मी आहे ऐशी तैशी
तू कुण्या गणतीचा






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.