२०१२-०३-३१

गीतानुवाद-००३: दिनेर आलो निभे एलो

 दिनेर आलो निभे एलो
मूळ बंगाली गीतः रबिंद्रनाथ ठाकूर


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०५


अक्र
दिनेर आलो निभे एलो
दिवस आला मावळतीलादिनेर आलो निभे एलो
सुज्जी डुबे डुबे
आकाश घिरे, मेघ जुटेछे
चाँदेर लोभे लोभे
दिवस आला मावळतीला
सूर्य बुडे बुडे
आकाशी येती मेघ भरून
चंद्रम्याच्या लोभे
मेघेर उपर मेघ करेछे
रंगेर उपर रंग
मंदिरेते काँसर घंटा
बाजलो ढंग ढंग
मेघावरी मेघ भरे
रंगावरी रंग
मंदिरातील कांस्य घंटा
वाजते ढंग ढंग
बादल हावाय मने पडे
छेले बेलार गान
वृष्टी पडे टापूर टुपूर
नदे एलो बान
वादळी हवेत मला स्मरे
लहानपणीचे गान
पाऊस पडे टापूर टुपूर
नदीला ये उधाण
मूळ बंगाली कविताः गुरू रबिंद्रनाथ ठाकूर
उच्चार आणि अर्थशोधन साहाय्यः गोरा चक्रबोर्ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.