२०१७-१२-२७

गीतानुवाद-१०३: तेरा मेरा प्यार अमर

गीतकार: शैलेन्द्र, संगीतकार: शंकर जयकिशन, गायक: लता मंगेशकर, 
चित्रपट: असली नकली, साल: १९६२, कलाकार: देवानंद, साधना

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७१२२७

धृ
तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यो मुझको लगता है डर
मेरे जीवन साथी बता
क्यो दिल धड़के रह रह कर

तुझी माझी प्रीत अमर
भीती का मज वाटे परी मग
माझ्या जोडीदारा तू सांग
का धडधड ही वाढे तरी मग

क्या कहा है चाँद ने
जिसको सुन के चाँदनी
हर लहर पे झूम के
क्यो ये नाचने लगी
चाहत का है हरसू असर
फिर क्यो मुझ को लगता है डर
काय म्हणाला चंद्रमा
जे ऐकून कौमुदी
हर लहरीवर नाचते
कशाला नाचू लागली
आवडीचा चौफेर बहर
भीती का मज वाटे परी मग


कह रहा है मेरा दिल
अब ये रात ना ढले
खुशियों का ये सिलसिला
ऐसे ही चला चले
तुझ को देखू, देखू जिधर
फिर क्यो मुझ को लगता है डर

सांगते आहे माझे मन
आता ही रात्र सरो मुळी न
आनंदाची ही वाटचाल
अशीच चालत राहो बस
तुझा जिथे जिथे वावर
भीती का मज वाटे परी मग


है शबाब पर उमंग
हर खुशी जवान है
मेरे दोनो बाहों में
जैसे आसमान है
चलती हू मैं तारों पर
फिर क्यो मुझ को लगता है डर

यौवनावरती हुरूप
आनंद हर युवा असे
माझ्या दोन्ही बाहूंत
जणू की आसमान हे
चालते मी जणू तार्‍यांवर
भीती का मज वाटे परी मग
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.