२०१३-०७-०४

गीतानुवाद-०२१: तेरी निगाहों पे

मूळ हिंदी गीत: जावेद अन्वर, संगीत: उषा खन्ना, गायक: मुकेश
चित्रपट: शबनम, साल: १९६४, भूमिका: महमुद, विजयालक्ष्मी, हेलन, जीवन, मुखरी, मोहन चोटी, श्याम

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे  २००६०९२१


तेरी निगाहों पे मर-मर गए हम!
तुझ्या डोळ्यांवरती मी भाळलो !



धृ
तेरी निगाहों पे मर-मर गए हम,
बाँकी अदाओं पे मर-मर गए हम
क्या करें, क्या करें, क्या करें
तुझ्या डोळ्यांवरती मी भाळलो
अवखळ लकबींवरती मी भाळलो
काय करू, काय करू, काय करू



ज़ुल्फ़ों में लेके सारी रात चले
सारा ज़माना लिए साथ चले
ऐसे में जीने का मज़ा है सनम
आँखों से तेरी-मेरी बात चले
बेवफ़ा एक निगाह, देख ले देख भी ले
घेऊन केसांत काळी रात्र चलू
सार्‍या जगाला घेऊन साथ चलू
अशा जगण्यातच मजा आहे सये
नेत्रपल्लवीत हितगूज करू
वंचिके, बघ तरी, एकदा, एकवार



तेरी अदा का तो जवाब नहीं
मेरी वफ़ा का भी हिसाब नहीं
सूरत तुम्हारी बड़ी खूब सही
दिल तो हमारा भी खराब नहीं
बेवफ़ा एक निगाह, देख ले देख भी ले
तुझ्या तोर्‍यास उपमा मुळी
प्रेमाचा माझ्याही थांग मुळी
सुंदर खूप तुझा चेहरा असो
अंतर माझेही, वाईट नाही
वंचिके, बघ तरी, एकदा, एकवार



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.