२०१९-०३-१५

गीतानुवाद-१२३: ओ बेकरार दिल


मूळ हिंदी गीतः कैफी आझमी, संगीतः हेमंतकुमार, गायकः लता
चित्रपटः कोहरा, सालः १९६४, भूमिकाः वहिदा रेहमान


धृ
ओ बेकरार दिल
हो चुका है मुझको आसुओंसे प्यार
मुझे तू खुशी न दे, नयी जिंदगी न दे

अस्वस्थ ए मना
जडली आहे दुःखांशी माझी प्रीत
मला तू सुखे न दे, नवे आयुष्य न दे


मिली चमन को बहार
हँसीं फूल को मिली
गीत कोयल को मिले
और मैने पायी खामोशी
मुझे बाँसुरी न दे, कोई रागिनी न दे

मिळे उपवना बहार
हास्य फुला मिळाले
कोकिळेस मिळे गीत
मला मौन मिळाले
मला बासरी न दे, मला रागिणी न दे

आए घटा, घिर के घटा छाए
और प्यासी कली
गम की जली
तरस तरस जाए
रहे सदा जो मेरी
वही मेरी जिन्दगी
है रोज अंधेरा और
चार दिनकी चाँदनी
मुझे चाँदनी न दे, मुझे रोशनी न दे

आले मेघ, वर अंधारुन आले
आणि अतृप्त कळी
दुःखतप्त
म्लान म्लान होई
राही नेहमी जे माझे
तेच आयुष्य माझे
आहे अंधार रोजचा आणि
चार दिवस चांदणे
मला चांदणे न दे, मला दिप्तीही न दे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.