२०१८-०७-२८

गीतानुवाद-१२०: कभी बेकसी ने मारा



मूळ गीतकार: आनंद बक्षी, संगीतः आर.डी.बर्मन गायक: किशोरकुमार
चित्रपटः अलग अलग, सालः १९८५, भूमिकाः राजेश खन्ना
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०१२५

धृ
ये गज़ल है, न गीत है कोई
ये मेरे दर्द की कहानी है
मेरे सीने में सिर्फ शोले है
मेरी आँखों में सिर्फ पानी है
कभी बेकसी ने मारा
कभी बेबसी ने मारा
गिला मौत से नहीं है
मुझे जिंदगी ने मारा

ही गझल नाही, न हे गीत आहे कुठले
ही तर माझ्या दु:खाची कहाणी आहे
माझ्या छातीत निखारे केवळ
माझ्या डोळ्यात फक्त पाणी आहे
कधी हीनतेने छळले
कधी दीनतेने छळले
गार्‍हाणे मृत्यूशी ना
मला जीवनाने छळले

मुकद्दर पे कुछ जोर चलता नहीं
वो मौसम है ये जो बदलता नहीं
कहीं थी ये बदनसीबी
कहीं थी मेरी गरीबी
किस किस का नाम लूँ मैं
मुझे हर किसी ने मारा
नशीबावर काही जोर चालत नाही
तो ऋतू आहे, जो मुळी बदलत नाही
कधी होती बदनशीबी
कधी होती मम गरीबी
कुणाकुणाचे नाव घेऊ
मला प्रत्येकाने छळले

बेमुरव्वत बेवफ़ा, दुनिया है यह
है यही दुनिया तो क्या दुनिया है यह
न कमी थी दोस्तों की
न कमी थी दुश्मनों की
कहीं दुश्मनी ने लूटा
कहीं दोस्ती ने मारा
बेगुमान, कृतघ्न, ही दुनिया सारी
अशी असेल दुनिया तर, काय ही आहे
न कमी मित्रांची होती
न कमी शत्रुंची होती
कुठे दुष्मनांनी लुटले
कुठे मित्रत्वाने छळले

उजालों से वेशत मुझे हो गयी है
अंधेरों की आदत मुझे हो गयी है
रहा जब तलक अंधेरा
ओह, कटा खूब वक़्त मेरा
मुझे चांदनी ने लूटा
मुझे रोशनी ने मारा
मला उजेडाचा धाक भरला आहे
मला अंधाराची सवय झाली आहे
अंधेर राहिला जोपर्यंत
माझा वेळ चांगला गेला
मला चांदण्याने लुटले
मला प्रकाशाने छळले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.