२०१८-०४-०५

गीतानुवाद-१०६: चढता सूरज धीरे धीरे


चढता सूरज धीरे धीरे
गायक: अझिज नाजाँ
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३२१

प्रस्ताव
हुए नामवर
बेनिशां कैसे कैसे
ज़मीं खा गयी
नौजवान कैसे कैसे
झाले नामदार
नामशेष किती पट्टीचे
ग्रासले भुईने
नौजवान किती उमेदीचे

धृ
आज जवानी पर इतराने
वाले कल पछतायेगा \-
चढता सूरज धीरे धीरे
ढलता है ढल जायेगा \-
ढल जायेगा ढल जायेगा \-
आज यौवनाने मत्त,
पस्तावा उद्या करशील\-
चढता सूर्य हळूहळू,
ढळतोची, ढळत राहील\- 
ढळतोची, ढळत राहील \-

तू यहाँ मुसाफ़िर है ये सराये फ़ानी है
चार रोज की मेहमां तेरी ज़िन्दगानी है
ज़र ज़मीं ज़र ज़ेवर कुछ ना साथ जायेगा
खाली हाथ आया है
खाली हाथ जायेगा
जानकर भी अन्जाना बन रहा है दीवाने
अपनी उम्र ए फ़ानी पर तन रहा है दीवाने
किस कदर तू खोया है
 इस जहान के मेले मे
तु खुदा को भूला है फंसके इस झमेले मे
आज तक ये देखा है पानेवाले खोता है
ज़िन्दगी को जो समझा ज़िन्दगी पे रोता है
मिटनेवाली दुनिया का
ऐतबार करता है
क्या समझ के तू आखिर
इसे प्यार करता है
अपनी अपनी फ़िक्रों में
जो भी है वो उलझा है \- 
ज़िन्दगी हक़ीकत में
क्या है कौन समझा है \-
आज समझले कल ये मौका
हाथ न तेरे आयेगा
ओ गफ़लत की नींद में
सोनेवाले धोखा खायेगा
चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा
तू इथे प्रवासी अन् हा निवास जुजबी आहे
जीवनाचे पाहुणपण चार दिसासाठी आहे
स्थावर आणि जंगमही काही ना सवे जाईल
रिक्तहस्त तू आलास
रिक्तहस्त तू जाशील
जाणूनही अज्ञानाचे तू वेड पांघरसी
क्षणभंगूर आयुष्याचाही गर्व बाळगसी
कसा कसा तू गुरफटसी 
जत्रेतही संसारी
भवसागरी बुडता तू ईश्वरासही भुलसी
आजवरी दिसले हे, गमावतो पावणाराही
जीवनास जो समझे, रडतो जीवनावरही
नश्वर दुनियेचा
का म्हणून, भरवसा करसी
काय समजुनी अखेर
प्रेम जगावर करसी
आपल्याच काळजीत
जो जगतो, गुरफटतो\-
वास्तवात जीवन हे
काय कोण ओळखतो \-
आज समज तू ही संधी
ना उद्या पुन्हा येईल
झोपणार्‍या बेसावध
दचकशील, धोका खाशील
चढता सूर्य हळूहळू ढळतोची, ढळत राहील

मौत ने ज़माने को ये समा दिखा डाला
कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला
याद रख सिकन्दर के हौसले तो आली थे
जब गया था दुनिया से दोनो हाथ खाली थे
अब ना वो हलाकू है
और ना उसके साथी हैं
जंग जो न कोरस है
और न उसके हाथी हैं
कल जो तनके चलते थे
अपनी शान--शौकत पर
शमा तक नही जलती
आज उनकी क़ुरबत पर
अदना हो या आला हो
सबको लौट जाना है \-
मुफ़्हिलिसों का अन्धर का
कब्र ही ठिकाना है \-
जैसी करनी वैसी भरनी
आज किया कल पायेगा
सरको उठाकर चलनेवाले
एक दिन ठोकर खायेगा
चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा
मृत्यूने जगाला ह्या हेही दृश्य दाखवले
दिग्गज मातब्बर हे जमीनदोस्तही केले
आकांक्षा विश्वजयाची सिकंदरा होती
जातांना रिक्तहस्त मूर्ती तयाची होती
आज ना लढाऊ तो
आणि न त्याचे साथी आहेत
न युद्ध ते, ना सैन्य
न त्यांचे हत्ती आहेत
पूर्ण ऐट-तोर्‍याने
काल ताठ चालत जे
ज्योतही समाधीवर
त्यांच्या आज ना जळते
रंक हो असो राजा
परतणे सर्वांना आहे /-
नश्वरांचे, मर्त्यांचे
समाधी हे ठाणे आहे /-
जशी करणी तशीच भरणी
आज कर उद्या घेशील
ताठ मान चलणार्‍या
ठोकर एक दिस खाशील
चढता सूर्य हळूहळू ढळतोची, ढळत राहील

मौत सबको आनी है
कौन इससे छूटा है
तू फ़ना नही होगा ये खयाल झूठा है
साँस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे
बाप माँ बहन बीवी
बच्चे छूट जायेंगे
तेरे जितने हैं भाई
वक्तका चलन देंगे
छीनकर तेरी दौलत दोही गज़ कफ़न देंगे
जिनको अपना कहता है सब ये तेरे साथी हैं
कब्र है तेरी मंज़िल और ये बराती हैं
ला के कब्र में तुझको मुरदा बक डालेंगे
अपने हाथोंसे तेरे मुँह पे खाक डालेंगे
तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे
तेरे चाहनेवाले कल तुझे भुला देंगे
इस लिये ये कहता हूँ खूब सोचले दिल में
क्यूँ फंसाये बैठा है जान अपनी मुश्किल में
कर गुनाहों पे तौबा
आके बस सम्भल जायें \-
दम का क्या भरोसा है
जाने कब निकल जाये \- 
मुट्ठी बाँधके आनेवाले
हाथ पसारे जायेगा
धन दौलत जागीर से तूने
क्या पाया क्या पायेगा
चढता सूरज धीरे धीरे
ढलता है ढल जायेगा \-
मृत्यू प्रत्येका येणार
ह्यातुन कोण सुटला आहे
तू न नष्ट होशील हा ही विचार खोटा आहे
श्वास संपता सगळी नाती नष्ट होताती
मायबाप, बहिण, पत्नी
मुलेही नाहीशी होती
जे तुझे भाऊ असतील
काळाचे चलन देतील
हरून संपदा सारी, दोन वार कफन देतील
ज्यांना आपले म्हणसी हेच सोबती असती
कबर घर तुझे आणि तव वरात हे नेती
ठेवून कबरीमध्ये, 'प्रेतम्हणतील तुजला
तोंडावर माती सारतील हातांनी आपल्या
सर्व तव कहाणीला मिळवतील मातीत हे
तुला चाहणारे हे विसरतील तुला सारे
मी म्हणून म्हणतो विचार कर मनामध्ये
का उगाच गुरफटसी दु:खी संसारामध्ये
फारकत गुन्ह्यांशी घे
सावर संसारी रे \-
भरवसा न श्वासाचा
साथ कधीही सोडिल रे \-
बंद मूठ येणार्‍या
मुक्तहस्त तू जाशील
साधलेस धनदौलत अर्जून
काय साधशील
चढता सूर्य हळूहळू,
ढळतोचीढळत जाईल \- 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.