२०१८-०४-१९

गीतानुवाद-१०७: हमे तो लूट लिया



मूळ हिंदी गीतः शिवान रिझवी, संगीतः बुलो सी.रानी,
गायक: इस्माईल आझाद कव्वाल आणि साथीदार,
चित्रपटः अल हिलाल, सालः १९३५, कलाकारः कुमार, इंदिरा, याकूब, सितारादेवी, कयाम अली, महबूबखान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५१२०५

धृ

हमे तो लूट लिया, मिल के हुस्न वालों ने काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने
मिळून खलास केले आम्हास, रूपबालांनी काळ्या काळ्या केसांनी, गोर्‍या गोर्‍या गालांनी
नजर में शोखियाँ और बचपना शरारत में
अदाए देख के हम फंस गए मोहब्बत में
हम अपनी जान से जाएंगे जिनकी उल्फत में
यकीन है कि न आएंगे वो ही मैयत में
खुदा सवाल करेगा अगर कयामत में
तो हम भी कह देंगे हम लुट गए शराफत में
वीज नजरेत, पोरकटपणा खोड्यांत असे
बघून लकबी त्या, प्रेमी पुरूष सहज फसे
आम्ही जीवही द्यावा कहाण्यांवर ज्यांच्या
श्रद्धांजलीही मेल्यावर न त्या देतील आम्हा
ईश्वर आम्हाला विचारेल जरी कल्पांती
आम्ही म्हणू की गेलो नागविले शहाजोगपणे

वहीं वहीं पे कयामत हो वो जिधर जाए
झुकी झुकी हुई नजरों से काम कर जाए
तडपता छोड दे रस्ते में और गुजर जाए सितम तो ये है कि दिल ले ले और मुकर जाए
समझ में कुछ नही आता कि हम किधर जाए यही इरादा है ये कह के हम तो मर जाए
जिथे जिथे जाती त्या तिथे कहर घडे
खाल-नजरांनी कमालीची करामतही घडे
वाटेतच आसुसला सोडून त्या निघून जाती
गुन्हा असा की हृदय घेऊनी निघून जाती
कळत मुळी नसे, आम्ही कुठे आता जावे
असेच वाटे की हे कथून जीवित संपवावे

वफा के नाम पे मारा है बेवफाओं ने
कि दम भी हम को न लेने दिया जफाओं ने
खुदा भुला दिया इन हुस्न के खुदाओं ने
मिटा के छोड दिया इश्क की खताओं ने
उडाए होश कभी जुल्फ की हवाओं ने
हया--नाज ने लूटा, कभी अदाओं ने
प्रेमाच्या नावे निष्ठुरांनी घात केला त्या
की श्वासही न कठोरांनी घेऊ दिला त्या
विसर देवांचाही पाडीला देवींनी त्या
की नामशेष केले अपराधांनी प्रेमाच्या
कधी बेहोष केले केशसुगंधांनी आणि
भुरळ पाडली लकबींची, कधी प्रेमाची

हजारो लुट गए नजरों के इक इशारे पर
हजारो बह गए तूफान बन के धारे पर
न इनके वादों का कुछ ठीक है न बातों का फसाना होता है इनका हजार रातों का
बहुत हसी है वैसे तो भोलपन इनका
भरा हुआ है मगर जहर से बदन इनका
ये जिसको काट ले पानी वो पी नही सकता
दवा तो क्या है दुआ से भी जी नहीं सकता
इन्ही के मारे हुए हम भी है जमाने में
है चार लफ्ज मोहब्बत के इस फसाने में
हजार खपले नयनांच्या कटाक्षांवर ह्या
हजार वाहिले वादळ बनून ओघाने
ह्यांच्या वचनांचे खरे नाही न बोलांचेही
प्रतारण होते खरे, ते हजार रात्रींचे
भोळेपणाची ह्यांच्या भुरळ सगळ्यांना पडे
मात्र भरलेले शरीरात सर्व विष असे
ह्या ज्याला दंशती तो पाणीही मागू न शके औषधच काय, प्रार्थनाही न उपयोगी पडे
ह्या साऱ्यांचे पाहा सावज झालो आम्ही
प्रेमाच्या अडीच अक्षरांची ही किमया सारी

जमाना इनको समझता है नेकवर मासूम
मगर ये कहते हैं क्या है किसीको क्या मालूम इन्हे न तीर न तलवार की जरूरत है
शिकार करने को काफी निगाहें उल्फत हैं
हसीन चाल से दिल पायमाल करते हैं
नजर से करते हैं बातें, कमाल करते हैं
हर एक बात में मतलब हजार होते हैं
ये सीधे-सादे बडे होशियार होते हैं
खुदा बचाए हसीनों की तेज चालों से
पडे किसी का भी पाला न हुस्न वालों से
जग समझते सच्च्या नि निरागस ह्यांना
परी ह्या म्हणती काय ते कुणा नसे ठाऊक
ह्यांना न गरज मुळी तीर तरवारींची कधी शिकारीसाठी नयनांचे कटाक्षच पुरती
कटाक्ष तीरसे सोडूनी कमाल ह्या करती
हृदये पायतळी चाल तुडविते ह्यांची
यांच्या बोलण्याचे अर्थच हजार निघती आणि वाटती साध्या तरी चलाख ह्या असती
देवच सुंदरींच्या वाचवो ह्या चालींपासून
होवो सामना कुणाचाही न कधी ह्यांच्याशी

हुस्न वालों में मोहब्बत की कमी होती है
चाहने वालों की तकदीर बुरी होती है
इनकी बातों में बनावट ही बनावट देखी
शर्म आँखों में, निगाहों में लगावट देखी
आग पहले तो मोहब्बत की लगा देते हैं
अपनी रुख्सार का दीवाना बना देते हैं
दोस्ती कर के फिर अंजान नजर आते हैं
सच तो ये है कि बेईमान नजर आते हैं
मौत से कम नहीं दुनिया में मोहब्बत इनकी
जिंदगी होती हैं बरबाद, बदौलत इनकी
दिन बहारों के गुजरते हैं मगर मर-मर के
लूट गए हम तो हसीनों पे भरोसा कर के
रूपवतींत प्रेम नेहमी असतेच कमी
दैवे चाहत्यांची असती न सदा धार्जिणी
यांच्या बोलात खोटे, नि लटके सारे
लाजत्या नयनी लोभसशी ओढ ती असते
आस प्रेमाची प्रथम लावूनी देती ह्या मनी
वेड रूपाचेही लावूनी देती ह्या मनी
मैत्री साधून पुन्हा, वागती अनोळखी ह्या
मला अप्रामाणिकच खर्‍या दिसती ह्या
मृत्युहून मुळी न कमी प्रेम ह्यांचे जगी असते
जीवन बरबादही ह्यांचेमुळेची ना होते
बहरण्याचे दिवस सरती, तेही मरत-मरत
संपलो आम्ही तर देवींचा ह्या विश्वास करत


https://www.youtube.com/watch?v=tpeidMTBT2I


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.